Video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते.यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो. काहीतरी वेगळं हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये नवरदेवाचा हळदीच्या कार्यक्रमातला डान्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
जेव्हा नवरदेव विसरतो हळद त्याचीच आहे
सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणताय जेव्हा नवरदेव विसरतो हळद त्याचीच आहे. हा नवरदेव स्वत:च्याच लग्नात भान हरपून नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा नवरदेव स्वत:च्याच हळदी कार्यक्रमात दुसऱ्या एका तरुणीबरोबर ‘मुझसे शादी करोगी’ या गाण्यावर डान्स करत आहे. दोघांच्या डान्स स्टेप अशा आहेत की सगळेच पाहात राहिले आहेत.
यावेळी वराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वराचे मित्रही त्याच्या डान्सला स्टेप बाय स्टेप पाठींबा देत उत्कृष्ट कोरीओग्राफीचा नमूनाच त्यांनी सादर केला आहे. नवदेवाचा उत्साह पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. नवऱ्याने इतर सर्वांना डान्स मध्ये अक्षरश: फेल केले आहे. या व्हिडीओला खूपच पाहिले जात असून पसंद केले जास्त आहे.
त्याच्या मागे डान्स करणाऱ्या तरुणी सुद्धा खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे पण नवरदेवाने सर्वांचे लक्ष त्याच्या:कडे वेधून घेतले आहेसोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलं आहे की, ‘नवरी सोडून कोणा सोबत नाचतोय.’ तर आणखी एकानं ‘थांब भावा लग्न मोडेल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हे पण वाचा
- विकास हेच माझे ध्येय…. अपक्ष उमेदवार भगवानभाऊ पाटील (महाजन)
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढता प्रतिसाद बघून विरोधक चिंतेत; यावेळेस मतदार संघात बदल होणार?
- Viral Video :’तरुणाची दाढी काढा,अन् प्रेम वाचवा’ तरुणींनी काढली रॅली,पाहा हास्यास्पद व्हायरल व्हिडिओ.
- ऑनलाईन गेम्सच्या व्यसनामुळे कर्जात बुडालेल्या पोलीस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल;जे घडल ते भयंकर.
- भुसावळात २५ वर्षीय महिलेच्या डोक्यात रॉडसदृश वस्तू मारून खून; संशयीत पतीस मनमाड रेल्वे स्थानकावर अटक.