मलकापूर :- पोळ्याच्या दिवशी दुःखद घटना घडली आहे. पोळ्याच्या दिवशी बैल सजवण्याआधी त्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे (वय ३२) तर हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २७) अशी मृतकांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तातडीने प्रशासनाला अलर्ट केले.
हरणखेड तालुका मलकापूर येथे व्याघ्रा नदीवर पूर आल्यामुळे पुरात गावातील शेतकरी गोपाळ वांगेकर हा बैल धुण्यासाठी गेला असता बैल व गोपाल हे दोघेही या पुरात वाहून गेले त्यानंतर बुलढाण्याहून रेस्क्यू टीम आल्यावर त्या टीमने शोध घेतल्यानंतर तब्बल तीन तासानंतर गोपाल वांगेकर हा सापडला.यावेळी आ. राजेश एकडे, नगराध्यक्ष हरीश रावळ, संतोषराव रायपुरे, अरुण अग्रवाल, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार उगले,पोलीस निरीक्षक संदीप काळेसह संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले. दोन्ही शेतकऱ्यांच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून या दुर्दैवी घटनेबद्दल आ. राजेश एकडे यांनी शोक संवेदना व्यक्त करीत मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन करीत धीर दिला.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






