Video: उत्तर प्रदेशातील जसराणा तहसील भागातील नागला तुर्सी येथे तहसीलदरा आणि महसूल पथकांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.दोन व्यक्तींमध्ये जमिनीच्या वाद झाला होता तर तहसीदार आणि महसूल विभागाचे अधिकारी त्यांना मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. मध्यस्थी दरम्यान तहसीलदारांसोबत गैरवर्तन केले.मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीचा वाद दोन गटांमध्ये पेटला. त्यांना मध्यस्थी करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी आले.
घटनास्थळी दोघांन्ही घटनास्थळी आलेल्या तहसीलदारांशी गैरवर्तन केले. एकाने कानाखाली मारली. ही संपुर्ण घटना एकाने फोनमध्ये कैद केली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना अटक केले.धर्मेंद्र आणि वीरेश्वर अशी दोन आरोपींची नावे आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, वादविवाद झालेल्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे.
गैरवर्तन केल्या प्रकरणी अटक
पोलिसांनी दोघांना गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक केले आहे. तहसीलदार ललता प्रसाद यांनी औपचारिक तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांवर शांतता भंग केल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे. या घटनेबाबत, फिरोजाबाद पोलिसांनी सांगितले की, जसराणा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे पण वाचा
- विकास हेच माझे ध्येय…. अपक्ष उमेदवार भगवानभाऊ पाटील (महाजन)
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढता प्रतिसाद बघून विरोधक चिंतेत; यावेळेस मतदार संघात बदल होणार?
- Viral Video :’तरुणाची दाढी काढा,अन् प्रेम वाचवा’ तरुणींनी काढली रॅली,पाहा हास्यास्पद व्हायरल व्हिडिओ.
- ऑनलाईन गेम्सच्या व्यसनामुळे कर्जात बुडालेल्या पोलीस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल;जे घडल ते भयंकर.
- भुसावळात २५ वर्षीय महिलेच्या डोक्यात रॉडसदृश वस्तू मारून खून; संशयीत पतीस मनमाड रेल्वे स्थानकावर अटक.