जामनेर :- सकाळी क्लास असल्याने नेहमीप्रमाणे पहाटे उठून जामनेरला क्लाससाठी आज देखील निघाली होती. मात्र या तरुणीवर काळाने झडप घातल्याची घटना घडली आहे. नदीवरून पायी रस्ता पार करत असताना तरुणीचा तोल जाऊन ती पुरात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला.या घटनेने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १८) असे या घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील खादगाव येथील पूनम बाविस्कर ही रोज सकाळी जामनेरला क्लाससाठी यायची. रोजप्रमाणे आज सकाळी देखील क्लासला जाण्यासाठी निघाली असता कांग नदीच्या पुलावरून जात हि दुर्दैवी घटना घडली आहे. पुलावरून वाहने जात असल्याने पूनम ही पुलाच्या किनाऱ्याने जात होती. कांग नदीला पूर असल्याने ती नदीतील पुराच्या पाण्याकडे पाहत होती. याच वेळी तिचा तोल जाऊन ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविली असता मुलीचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रातील काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला. पूनमचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- महावितरणकडून धडक मोहीम,विज बिल कमी यामुळे मीटर चेकिंग मोहीम,७७ वीज ग्राहकांचे मीटर घेतले तपासणीसाठी ताब्यात.
- कांताई धरणाच्या पाण्यातून यंत्राच्या साह्याने भरमसाठ अवैध वाळू उपसा ; ऊपाय योजना करा मागणी.
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.२० जानेवारी २०२५
- एरंडोल बस आगारातर्फे इंधन बचत या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन.
- लग्नानंतर अवघ्या एकाच महिन्यात त्यांच्या संसाराला लागली दृष्ट; पतीचा मृत्यू नंतर विरह सहन न झाल्याने तिसऱ्याच दिवशी पत्नीने संपविले जीवन.