
मुंबई :- अनोळखी महिलेशी ओळख आणि भेट मुंबईमधील एका विवाहित रियल इस्टेंट एजेंटला चांगलेच महागात पडले आहे. महिलेच्या भेटीनंतर तोतया पोलिसांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले असून याबाबत पत्नीला सांगू, अशी धमकी देत तब्बल १० लाख रुपये उकळल्याची घटना बोरिवली पश्चिममध्ये घडली.अंकित अग्रवाल असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत एमएचबी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी व्यक्तीशी मैत्री महागात पडली
याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अंकित अग्रवाल (वय, ४२) हा एमएचबी पोलीस ठाणे हद्दीमधील बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनी येथे राहतो. त्याच परिसरात फूड स्टॉल चालवणाऱ्या उषा शेट्टी नावाच्या महिलेशी त्याची ओळख होती. या उषा शेट्टी नावाच्या महिलेने अंकितची दुसऱ्या महिलेशी ओळख करून दिली, त्यानंतर अंकित आणि संबंधित महिलेची मैत्री झाली. 22 ऑगस्ट रोजी संशयित महिलेने अंकितला फोन करून उषा शेट्टीच्या घरी भेटण्यास सांगितले. अंकित महिलेला भेटण्यासाठी उषाच्या घरी गेला आणि दुपारी तीनच्या सुमारास उषाच्या घरातून निघून गेला.
तोतया पोलिसांनी १० लाखाला लुटलं!
उषाच्या घरातून बाहेर पडताच अचानक काही अंतरावर दोन अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आले, जे स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत होते. दोन्ही कथित पोलिस अधिकाऱ्यांनी अंकितला तो उषाच्या घरी भेटलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन करत होता. जर त्याने हे त्याच्या पत्नीला सांगितले तर त्यांचे नाते तुटेल आणि गुन्हा दाखल होऊन त्याला अटक होईल, अशी धमकी दिली. या धमकीने घाबरलेल्या अंकितकडे या तोतया पोलिसांनी याबाबत पत्नीला न सांगण्याचे आश्वासनही देऊन त्याबदल्यात 15 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणाने आपल्या मित्राकडून त्यांना पैसे घेऊन दिले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.