
नंदुरबार : येथील शाळकरी – ११ वर्षाच्या विद्यार्थीनीचा – झालेला विनयभंगाप्रकरणी दोषी नराधमास फाशीची शिक्षा व शासनाकडून सरकारी वकिलाची निवड करुन सदर गुन्हा जलदगती न्यायालयात चालविणे ह्या मागणीसाठी नंदुरबार तहसिलदार यांना सकल मराठा समाज न्याय समितीवतीने निवेदन देण्यात आहे. शहरात मुक मोर्चा काढण्यात आला.
नंदुरबार शहरातील एका शाळेतील इयत्ता ०५ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन चिमुकलीचा शाळेतीलच – कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बदलापुरसह राज्यात इतर ठिकाणी घडलेल्या – घटनांप्रमाणे नंदुरबार येथील – विद्यार्थीनीवर विनयभंग करुन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. महिला व मुली असुरक्षित असुन नंदुरबार शहरात ११ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याची घटना निषेधार्थ आहे. म्हणुन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच शासनाकडुन उच्च सरकारी वकिलाची निवड करुन सदरच्या गुन्हाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.
पहा मुक मोर्चा व्हिडिओ
अशा घटनांबाबतीत कायद्यात नवीन तरतुदी करुन त्वरीत बदल करण्यात यावा. या मागणीसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथील सकल मराठा समाज न्याय समितीतर्फे निवेदन देण्यात येत आहे. सकल मराठा समाज न्याय समिती महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश या राज्याचे मुख्य संयोजक सुरत येथील सोमनाथ मराठे, भुसावळ येथील भानुदास भागवत पाटील, नशिराबाद येथीला गणेश नत्थू चव्हाण, धरणगाव येथील दिलीप हिलाल मराठे, एरंडोल येथील मनोज आनंद मराठे,
धुळे माजी महापौर भगवान बापूजी चौधरी,नंदुरबार येथील माजी नगरसेवक दिलीप चौधरी शिरसमणी सरपंच अरुण पाटील,जळगाव जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मराठी विठ्ठल मराठे, शिंदखेडा येथील विनायक अभिमन पवार, भूषण दिलीप मराठे, जळगाव येथील लोकेश पाटील, तळोदा पांडुरंग भाऊ मराठे, शांतीलाल गायकवाड, नंदुरबार येथील शाम बापू मराठे, अमित निरंजन मराठे, नितीन जगताप, पावमा हिरामण मराठे, रविंद्र अशोक पवार, चंद्रकांत शिवराम मराठे, सुनिल नामदेव मराठे, दिनेशचंद्र सुरेश चौधरी, जयराम हिलाल मराठे, प्रल्हाद लक्ष्मण मराठे, दिनू आप्पा मराठे, नवनीत शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते. अखिल भारतीय सकल मराठा समाज न्याय समितीतर्फे नंदुरबार येथे तहसीलदार यांना कुमारी कन्या अमित मराठे हिच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
अभिवादन करून सुरुवात
छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून तहसील कार्यालय येथे मोर्चा नेण्यात आला. संशयितांवर कडक कारवाई करावी, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवा आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले.
चिमुकल्या,शाळकरी मुली व महिलांची होती मोठ्या प्रमाणात उपस्थिती.
मूक मोर्चात नंदुरबार जिल्ह्यासह खान्देशातील विविध शहरांसह सुरत (गुजरात) येथूनही समाजबांधव यांच्यासह जिल्ह्यातील विविध समाजातील शेकडो नागरिक सहभागी झाले. महिला व मुलींची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चामध्ये सहभागी मोर्चेकऱ्यांना रस्त्यात पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या. खाली बॉटल संकलनासाठी स्वयंसेवकही सहभागी झाले.
रांग व शिस्त…
मौर्चेकरी शिस्तीत रांगेने मुख्य मार्गावरून निघाले, आप्रभागी चिमुकल्या होत्या, त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते.
शिवाय मोद्यांमध्ये सहभागी अनेकांच्या हातात निषेध फालक होते.
अनेकांनी काळी टोपी घालून, काळी फीत लावून मोर्चात सहभाग घेतला.
महिला व मुलीचा सहभाग लक्षवेधी होता.
मोर्चादरम्यान वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता मोर्चेकराच्या तर्फे घेण्यात येत होती.
मोर्चेतील महीलां व नागरिकांसाठी पाण्याचा बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या रिकाम्या बाटल्या लागलीच कार्यकर्त्याकडून लगेच उचचल्या जात होत्या.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……