विखरण-रिंगणगांव गटाची महावितरण संदर्भातील बैठक संपन्न…
एरंडोल :- तालुक्यातील जवखेडे खु, जवखेडे बु, टाकरखेडे, रवंजे खु, रवंजे बु, वैजनाथ, कढोली यांसह परिसरातील गावांना शेती व गावठाणचा विजेचा समस्या दैनंदिन सुरूच होत्या. या समस्यांना कायमचा तोडगा निघुन या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी एरंडोल येथे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
धरणगांव विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगीरे, एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजपाल गडाम, एरंडोल उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत महाजन, पाळधी विभागाचे सहाय्यक अभियंता लोकेश चव्हाण, रिंगणगांव विभागाचे सहाय्यक अभियंता युवराज तायडे, पिंपळकोठा विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश देसले यांच्या उपस्थितीत महत्वपुर्ण बैठक पार पडली.
यावेळी कमी दाबाने होणारा विज पुरवठा, अवेळी विद्युत पुरवठा बंद होणे यांसह अनेक समस्यांचा उपस्थित गावातील प्रतिनिधींनी पाढाच वाचला. यावर आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व मा.अमोलदादा पाटील यांनी उपस्थित शेतकरी, ग्रामस्थ यांच्या समस्या अधिकाऱ्यांना लक्षात आणुन देत, तातडीने यावर तोडगा काढुन महावितरणतर्फे ग्रामस्थ व शेतकरींना दैनंदिन होणाऱ्या गैरसोयीवर पुर्णविराम लावण्याचा सुचना दिल्या.
प्रसंगी मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, रवंजे सरपंच देविदास चौधरी सर, टाकरखेडा सरपंच प्रविण पाटील, वैजनाथ सरपंच कुंदन पाटील, उपसरपंच अनिल पाटील, जवखेडे खु सरपंच गोपाल पाटील, महारूतात्या पाटील, जवखेडे बु सरपंच विजय पाटील, रवंजे खु मा.उपसरपंच जनार्दन कोळी, दिनेश पाटील, रविंद्र पाटील यांचेसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !