दिंडोरी :- तालुक्यातील रासेगाव येथील एका विवाहितेने आपल्या 4 वर्षीय मुलासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील अश्विनी समाधान ढगे (वय 23) या विवाहितेने आपला चार वर्षाचा मुलगा रियांश समाधान ढगे (वय 4) याच्यासह विहीरीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मृत अश्विनी हिचे वडील परशराम आबाजी पाटील रा. निळवंडी ता. दिंडोरी यांच्या फिर्यादीनुसार जावई समाधान ढगे याचे बाहेर अनैतिक संबंध होते, त्याला अश्विनी विरोध करत होती, या कारणावरून तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावे यासाठी सासु व नवरा यांच्याकडून अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ चालू होता. त्यामुळे सासरच्या जाचाच कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद अश्विनीचे वडील परसराम पाटील यांनी दिली आहे.
याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती समाधान भिकाजी ढगे व सासू लिलाबाई भिकाजी ढगे रा. राशेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






