
नातं मग गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं असो वा पती-पत्नीचं दगा मिळाल्यावर व्यक्ती मनातून तुटून जाते. इतकंच नाही जर दगाही तुमच्यासोबत झाला असेल आणि शिक्षाही तुम्हालाच मिळाली असेल तर मग याहून अजून काय वाईट असू शकतं.अशीच एक घटना नुकतीच चीनमधून समोर आली आहे. इथे फॅन नावाच्या एका व्यक्तीला त्याच्याच पत्नीच्या अफेअरचा भांडाफोड करण्यासाठी तुरूंगात जावं लागलं आहे.अनेक वर्षापासून विवाहित या कपलला दोन मुलं आहेत.
पण काही दिवसांआधी फॅनला पत्नीचं एखाद्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय आला. आपला संशय दूर करण्यासाठी त्याने लिव्हिंग रूमसोबतच बेडरूमध्येही हिडन कॅमेरे लावले. एका आठवड्यात त्याच्यासमोर सत्य आलं. तो घरी नसताना पत्नीला भेटायला एक पुरूष येत असल्याचं त्याला समजलं. फॅनने पत्नीकडून घटस्फोट घेण्यासाठी हे फुटेज कोर्टात पुरावा म्हणून सादर केलं. पण त्याला याचा जराही अंदाज नव्हता की, हे त्यालाच महागात पडणार आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये फॅनने पत्नी आणि तिच्या वकीलाला घटस्फोटाची चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. पण त्यांच्यात काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे फॅनने पत्नीविरोधात सिव्हिल डॅमेजसाठी एक केस दाखल केली. पण त्याला हे माहीत नव्हतं की, त्याची पत्नीने त्याच्यापेक्षा जास्त तयारी करून ठेवली आहे.महिला एका स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पतीवर सहमतीशिवाय घरात कॅमेरे लावण्याचा आणि प्रायव्हसी भंग केल्याचा आरोप केला.
फॅनच्या पत्नीने त्याच्या विरोधात केस दाखल केली. झालं असं की, कोर्टाने फॅनला कोणत्याही कारणाशिवाय गुप्त रूपाने घरात कॅमेरे लावण्यासाठी 3 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.फॅनने या निर्णयाविरोधात अपील केली. पण कोर्टाने त्याची अपील फेटाळून लावली. आता फॅनला त्याच्याच घरात त्याच्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडल्याने तुरूंगात रहावं लागणार आहे. सध्या या घटनेवरून चीनच्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.