Viral Video: एकीकडे बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. शाळा, महाविद्यालयीन मुलींची छेड काढल्याच्या घटना समोर येत आहेत.अशातच नाशिकमध्ये छेड काढणाऱ्या टोळक्याला मायलेकींनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली असून ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये छेड काढणाऱ्या चार तरुणांना मायलेकींनी बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या पवननगर भागातील डॉ. हेडगेवार चौकातील ही घटना असून मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करत चौघांनाही ताब्यात घेतले आहे.संंबंधित महिला आपली मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत डॉ. हेडगेवार चौकातील महापालिका रुग्णालयात येत होती.
यावेळी चार टवाळखोर तरुणांनी त्यांची छेड काढली. सुरुवातीला तरुणांकडे महिलांनी दुर्लक्ष केले, मात्र तरुणांनी पुन्हा त्रास दिल्याने महिलेचा संताप अनावर झाला. ज्यानंतर त्यांनी टवाळखोरांच्या मागे जाऊन बेदम चोप दिला. महिलेसोबतच मागून आलेल्या महिलेची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीनं देखील टवाळखोरांना प्रसाद दिला.भरचौकात या मायलेकींनी टवाळखोर तरुणांना बेदम चोप दिला, मुलीने एका तरुणाच्या डोक्यात खुर्चीही घातली.
यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या माय-लेकींचा रुद्रावतार पाहून टवाळखोर तरुणांनी तिथून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून चारही महिलांना जेरबंद केले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असून मायलेकींनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ