हैवानी कृत्य करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक विविध कलमांतर्गतर्गत गुन्हा दाखल.
लखनऊ :- अल्ताफ नावाच्या कट्टरपंथी तरूणाने आपली ओळख लपवून हिंदू मुलीशी मैत्री केली. त्याचे आकाश या नाव बदलून हिंदू मुलीला धर्मांतरण करण्यास प्रवृत्त केले. तसेच त्यानंतर विवाह करण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला होता.अल्ताफला हिंदू युवतीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या ४ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याची धमकी दिली, याप्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील आहे.ही घटना मुरादाबाद जिल्ह्यातील मोझोला पोलीस ठाणे परिसरात घडली असून पीडित महिलेने तक्रारी म्हटले की, ती मुरादाबाद येथे लाइनपार प्रभागात राहते. पीडित महिला विवाहित असून एका ४ वर्षांच्या मुलीची आई आहे. ती कामासाठी अमरोहाला जाते. तिथे त्यांची अल्ताफशी भेट झाली. अल्ताफने आपली ओळख आकाश असल्याचे सांगितले. पीडित महिला नोकरीसाठी अमरोहा येथे जात असताना अल्ताफसोबत भेट झाली असून अल्ताफने पीडितेशी गोडगुलाबी गप्पा मारत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि अल्ताफने पीडितेशी मैत्री केली.
पीडितेने सांगितले की, ती घरात एकटी असताना अल्ताफ त्यांना भेटण्यासाठी मुरादाबाद येथे आला. घरात कोणीच नाही याची संधी सांधून त्याने महिलेवर बलात्कार केला. याबाबत महिलेने तक्रार करण्यास सांगितले असता त्याने लग्नाचे नाटक केले. अल्ताफने तिचा अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप महिलेने केला आहे. आकाश हा हिंदू नसून कट्टरपंथी असल्याचे कळाल्यावर पीडितेला मोठा धक्का बसला.महिलेचे म्हणणे आहे की, या व्हिडिओच्या नावाने तिला ब्लॅकमेल करून तिला पतीपासून वेगळे केले गेले. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती करू लागला.
अल्ताफने तिच्यावर मांस खाण्यासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव आणला. तिला दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यास सांगू लागला. तिने नकार दिल्याने अल्ताफने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर पीडितेने सांगितले की, २ सप्टेंबर रोजी अल्ताफ माझ्या घरी आला आणि तुला धर्मांतरण करावं लागेल अशी धमकी त्याने दिली. मी तसे करण्यास नकार दिल्यावर त्याने माझ्या ४ वर्षांच्या मुलीचे कपडे काढले. जर धर्मांतरण केले नाहीतर माझ्या मुलीवर बलात्कार करीन, अशी धमकी त्याने दिली. यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपी अल्ताफविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, पोक्सो कायद्यांसह विविध कलमांतर्गतर्गत अल्ताफवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……