भुसावळ : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सुपरवायझर असलेले ४८ वर्षीय व्यक्तीची सख्ख्या भावानेच प्लॉट विक्रीच्या वादातून डोक्यात बॅट टाकून हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. ११) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली.प्रदीप जयसिंग इंगळेे (वय ४८) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, हा खून मृताचा सख्खा भाऊ व वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी काडतूस चोरी प्रकरणातील संशयित सतीश जयसिंग इंगळे याने केल्याने त्याला अटक केली आहे.
वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक ४४ टाईप थ्रीमध्ये प्रदीप इंगळे वास्तव्यास होते. वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर होते. बुधवारी ते ड्यूटीवर गेले व दुपारी ते जेवणासाठी घरी आल्यानंतर भाऊ सतीश इंगळे याच्यासोबत वाद झाला. लाकडी बॅट डोक्यात मारल्याने व घाव वर्मी बसल्याने प्रदीप इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिस अधिकाऱ्यांची धाव
दरम्यान घटना घडल्यानंतर सतीश हा प्रदीपच्या मृतदेहाजवळ बसून होता.खुनाची माहिती कळताच भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम