पिंपरी चिंचवड :- शिवानी सुपेकर ही सव्वीस वर्षाची तरूणी विनायक आवळे नावाच्या वक्ती बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. गेल्या काही वर्षापासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहात होते.
विनायक हा रिक्षा ड्रायव्हर आहे. या दोघांचा काही कारणावरून वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचला. त्यात विनायकने शिवानीचा गळा आवळला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांने तिचा मृतदेह रिक्षात टाकला. ती रिक्षा त्याने शिवानीच्या आईच्या घरा समोर सोडली. त्यानंतर तो फरार झाला.
सकाळ झाल्यानंतर काही लोकांना संशय आला. त्यांनी रिक्षाच्या आत डोकावून पाहीलं. त्यावेळी त्यांना आतमध्ये शिवानीचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर तातडीने पोलीसांना बोलावण्यात आले. पोलीसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तिच्या प्रियकराचा शोध घेण्यात आला. पण ते हत्या करून फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत.
विनायक आवळे यानेच हा खून केला असावा असा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. वाकड पोलीस त्याचा अधिक शोध घेत आहेत. शिवानी सुपेकर हिचा विवाह झाला होता. मात्र तिचे तिच्या नवऱ्या बरोबर पटत नव्हते. या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. याच काळात शिवानीच्या आयुष्यात रिक्षा चालक असलेला विनायक आला. गेल्या दोन अडीच वर्षापासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात होते.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.