Viral Video: शाळेतील दिवस प्रत्येकाच्या आठवणीतील खास असतात. पहिल्या वर्गापासून ते शाळेतील शेवटच्या दिवसापर्यत अनेक गंमती-जमती तर कधी शिक्षकांसोबत झालेली भाडंण, असे सर्व काही कायम आठवणीत राहतात.आधीच्या काळी प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांना पाहून अतिशय घाबरत असत, मात्र सध्या सर्व चित्र बदलत चालले आहे. सोशल मीडियावर सध्या काही विद्यार्थी शिक्षकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो व्हिडिओ प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.सध्या सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेला व्हिडिओ बिहारमधील आहे.
जिथे बिहारच्या भगवानपूर येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील आहे. जिथे एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला त्याने केलेल्या मस्तीमुळे एका शिक्षकाने काही दिवसापूर्वी ओरडले होते. हाच राग मनात धरुन त्या विद्यार्थ्याने दोन दिवसानंतर अनेक व्यक्तींना आणून त्या शिक्षकाला मारहाण केली असल्याचे मीडिया रिपोर्टनुसार समजले आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ शाळेचा परिसर दिसून येत आहे. जिथे एका वर्गखोली आहे जिथे काही शिक्षक आणि काही विद्यार्थी तर काही व्यक्ती दिसून येत आहेत.
व्हिडिओ तुम्ही पाहिले तर एक तरुण आहे तो चक्क एका शिक्षकाला खुर्ची घेऊन मारताना दिसून येत आहे आणि दुसरा तरुण दुसऱ्या शिक्षकालाही मारहाण करताना दिसून येत आहे. संपूर्ण हाणामाराची व्हिडिओ शाळेतील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.बिहारमधील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ”एक्स”वरील ”@btetctet” या अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट (Post) करत कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे कारण सांगितलेले आहे. व्हिडिओ दोन दिवसापूर्वी पोस्ट होताच ३ हजारांच्या घरात नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून व्हिडिओवर ४०० घरात नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक सोशल साइटवर पाहिला गेला आहे. त्यानंतर अनेक यूजर्संकडून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील पहिल्या कमेंट्स यूजरने (Comments) बॉक्समध्ये लिहिले आहे की,”आजकालच्या मुलांना काय झालंय? त्यांच्या पालकांनी या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”ज्या मुलांना शिक्षकांचा आदर कसा करायचा हे माहित नाही ती, मुले भविष्यात गुन्हेगार बनतील आणि त्यांच्या कुटुंबाचे आणि समाजाचे नुकसान करतील” अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया या व्हिडिओला पाहिल्यानंतर आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






