सावदा (प्रशांत सरवदे) :- नशिराबाद पोलिस स्टेशन ला महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी मोहीत दिलीप कोळी राहणार भादली जळगांव हा मागील दिड महिन्यापासुन नशिराबाद पोलीसांना मिळत नव्हता. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री मनोरे यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना माहीती देवुन सदरचा आरोपी हा सावदा पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेबाबत कळविल्याने सपोनि विशाल पाटील यांनी एक पथक तयार करण्यात आले
त्यात पोहेकाँ विजय पोहेकर, सिकंदर तडवी, सुनिल कुरकुरे, बबन तडवी,पोकाँ विनोद दामोदर यांना वर नमूद आरोपीचा शोध घेणेकामी रवाना करुन सदर पोलीस पथकाने वरील आरोपीबाबत गोपनीय माहिती काढून त्यास गाते ता.रावेर येथे त्याचे नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले त्याचे कडे चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपीतास पुढील कारवाईकामी नशिराबाद पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक गणेश देशमुख व पथक यांचे ताब्यात दिले आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.