VIDEO : गुजरातच्या भावनगरमधील सिहोर येथील एका खासगी रुग्णालयात चप्पल काढायला सांगितली म्हणून डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी ही मारहाण केली आहे.रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षामध्ये जाण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णासोबत आलेल्या तरुणांना चप्पल काढण्यास सांगितले होते.यावरून तरुण इतका संतापलेल्या तरुणांनी डॉक्टर आणि तिथे उपस्थित असलेल्या नर्सिंग स्टाफला बेदम मारहाण केली.
पोलिसांनी तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.भावनगर शहरातील श्रेया नावाच्या हॉस्पिटलमध्ये 12 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, तीन आरोपी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले होते. हे तिघे तरुण रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात प्रवेश करत असताना तेथे उपस्थित डॉक्टर जयदीप सिंग गोहिल यांनी त्यांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितले.
याचा राग आल्याने तरुणांनी शिवीगाळ सुरू केली. प्रकरण इतके वाढले की तरुणांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली.आरोपींनी तिथे ठेवलेली औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करून रुग्णालयात गोंधळ घातला. एफआयआरमध्ये आरोपींनी डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !