मेजर दाम्पत्यासोबत पोलिसांनी छळाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, 5 पोलीस निलंबित
भुवनेश्वर :- येथे मेजरच्या होणाऱ्या पत्नीवर हल्ला आणि विनयभंगाच्या प्रकरणात सात आरोपींना अटक झाल्यानंतर फक्त चार तासात जामीन मिळाला. सर्व आरोपी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत.20 सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी त्यांना अटक केली. अतिरिक्त डीसीपी कृष्णा प्रसाद दास म्हणाले की, 11 मोबाइल फोन आणि आरोपींचे एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. 15 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास कार ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांनी मेजरसह त्यांच्या होणाऱ्या पत्नीशी गैरवर्तन आणि मारहाण केली होती.
या दाम्पत्याने तक्रार देण्यासाठी भरतपूर पोलीस ठाणे गाठले. भरतपूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी लष्कर अधिकाऱ्याला लॉकअपमध्ये डांबून त्याच्या होणाऱ्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मारहाण केल्याचा आरोपही पोलिसांवर आहे. पीडित तरुणी माजी ब्रिगेडियरची मुलगी आहे. 5 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात तिच्यासह मेजरसोबत पोलिसांनी छळाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
मेजर बंगालमध्ये तैनात
मुलीने सांगितले की बंगालमध्ये पोस्टिंग असलेले मेजर ओडिशात आले होते. तरुणी भुवनेश्वरमध्ये रेस्टॉरंट चालवते. 15 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा रेस्टॉरंट बंद करून ती मेजरसोबत घरी परतत होती. यावेळी तरुणांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. मेजरने छेड काढणाऱ्यांच्या कृतीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी मिळून मेजरला मारहाण केली. मेजर आणि त्याची होणारी पत्नी तक्रार देण्यासाठी भरतपूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांची तक्रार पोलिसांनी नोंदवली नाही. मेजरसह तरुणीने प्रश्न उपस्थित केले असता पोलिसांनी अत्याचार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तरुणीला अटक केली.

पोलिसांनी मारहाण करून खोलीत कोंडले
पीडीत तरुणी म्हणाली की, ‘महिला पोलिसांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. कॉरिडॉरमधून ओढून एका खोलीत नेले. येथे त्यांनी माझे हात-पाय बांधले आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा एका पोलिसाने माझा गळा दाबला तेव्हा मी स्वतःचा बचाव करण्यासाठी तिचा हात चावला. त्यानंतर तो अधिकच चिडला आणि त्याने मला आणखी मारहाण केली.

पोलीस घाणेरडे बोलत होते
तरुणीने सांगितले की, ‘काही वेळाने पुरुष पोलिस अधिकारी आला. त्यांनी माझे कपडे काढले. माझी ब्रा पण काढली. समोरून स्तनांना लाथ मारू लागला. मी वेदनेने ओरडत होतो म्हणून त्यांनी माझी पॅन्ट काढली. स्वत:च्या पँटची झिप उघडून लिंग बाहेर काढले, कुठे घेणार? किती वेळा घेणार? घ्यायला आवडेल की गप्प राहणार? मी मदतीसाठी जोरात ओरडत होते. तरुणीने सांगितले की, यावेळी पोलिसाने खूप अश्लील गोष्टी बोलल्या.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.