शहापूर :- संशय आणि वारंवार देण्यात येणाऱ्या टोमण्यामुळे एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यात घडलीय. शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात ही विवाहिता राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या चौघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. वारंवार संशय घेत टोमणे मारून, शिवीगाळ आणि मानसिक त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळीकडून त्रस्त झालेल्या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात घडली .
मला तू आवडत नाहीस, तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत, असे आरोप करत विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पती आणि मृत विवाहितेच्या सासरऱ्याला अटक केलीय. महिलेचा पती, सासू-सासरा आणि दीर या चौघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील कृतिका म्हात्रे हिचा विवाह काही महिन्यापूर्वी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथील वैभव अधिकारी याच्याशी झाला होता.
मात्र तू मला आवडत नाहीस तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत. असे पती वैभव पत्नी कृतीकावर वारंवार संशय घेऊन तिला नेहमीच शिवीगाळ करायचा. तर सासरा जनार्दन, सासू रत्न, आणि दीर समीर याबाबत वारंवार टोमणे मारायचे बुलेट ट्रेनच्या प्रकरणात गेलेल्या जमिनीचे पैसे कधी येतील, असे वारंवार विचारून कृतिकाला शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होते.
सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून कृतिकाने राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची तक्रार कृतिकाच्या माहेरच्या नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती व सासरा यांना अटक केली असून अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत.