भडगांव तालुक्यातील गिरड-आमडदे जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा भव्य भुमीपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न…

Spread the love

आमदार चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन; अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतुन कोट्यावधींचा निधीला मिळाली मंजुरी.

भडगांव :- तालुक्यातील गिरड-आमडदे जि.प.गटात आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन व दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतुन कोट्यावधींचा निधीला मंजुरी मिळाली आहे. यात धार्मिक स्थळांचा सर्वांगिण विकास, मुलभुत सुविधेची विकासकामे, आरोग्य, शिक्षण यांसह इतर क्षेत्रातील सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्वच कामांचा समावेश आहे. या विकासकामांचा भव्य भुमीपुजन व लोकार्पण सोहळा मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते व मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

प्रसंगी मा.जि.प.सदस्य दिनकरआबा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रतापनाना पाटील, पारोळा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मा.तालुकाप्रमुख देविदासतात्या पाटील, गिरड येथील मा.सरपंच संजय पाटील, आमडदे येथील संभाजी भोसले, पिंपरखेड येथील बाळासाहेब पाटील,अंजनविहिरे येथील जयवंत पाटील यांचेसह ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी