मला तिने मला धोका दिला, मी तिला अनेक वेळा परपुरुषासोबत गाडीने फिरताना बघितले ती सोडचिठ्ठी देईल या भीतीने पतीने पत्नीला संपविले. बॉडीजवळ ठेवली चिठ्ठी

Spread the love

सिंधुदुर्ग :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा खून केल्याची घटना कुडाळ तालुक्यात भडगाव-धनगरवाडी येथे घडली. सौ. रेणुका उर्फ रेश्मा ओमप्रकाश सिंह वय ४२ वर्षे, रा.नेरुर कवीलगाव, कुडाळ, मूळ राहणार आंबाटोला तालुका- टेरपा ,जिल्हा – पत्रातू ,राज्य झारखंड) असे या महिलेचे नाव असून तिचा पती ओमप्रकाश बंधन सिंह (वय ४२ वर्षे, सध्या राहणार भडगाव तालुका- कुडाळ, मुळ रा.आंबाटोला तालुका- टेरपा ,जिल्हा – पत्रातू ,राज्य झारखंड) याने तिला मारल्याचा पोलिसाना संशय आहे. रात्रौ ८.४५ ते पहाटे ४.४८ या मुदतीत ही घटना घडल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. दरम्यान संशयित ओमप्रकाश सिंह हा पळून गेला असून त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई येथे मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी कुडाळ पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.

या घटनेची खबर संशयित ओमप्रकाश सिंह यांच्या मुलीने कुडाळ पोलिसात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ओमप्रकाश बंधन सिंह हा सेंट्रिंग ची कामे करायचा. नेरूर कविलगाव येथे तो आपली पत्नी सौ. रेणुका उर्फ रेश्मा, तीन मुली आणि आणि एका मुलगा यांच्यासह भाड्याच्या खोलीत राहत होता. मार्च २०२४ मध्ये त्याला भडगाव येथे सेंट्रिंगचे काम मिळाले म्हणून तो त्या ठिकाणी राहू लागला. काही दिवस कुडाळ तर काही दिवस भडगाव असे त्याचे वास्तव्य असायचे. बऱ्याच वेळा या नवरा बायकोचे मुलांसमोरच सौ. रेणुका हिच्या चारित्य्रावरून वाद व्हायचे. ती परपुरुषासोबत फिरते असा ओमप्रकाश याला संशय होता. त्यामुळे तिला मारून मी पोलिसात जाईन असेही तो बोलायचा.

पत्नीला भडगावला बोलावून घेतले

ओमप्रकाश याने फोन करून आपली पत्नी सौ. रेणुका उर्फ रेश्मा हिला भडगावला बोलावून घेतले. ती भडगावला गेली. त्या संध्याकाळी फिर्यादी मुलीशी सौ. रेणुकाचे बोलणे देखील झाले. मुलीचे आपले वडील ओमप्रकाश यांच्याशी देखील बोलणे झाले. त्यांनी त्यावेळी ते ओरोस येथे असल्याचे सांगितले. नंतर त्या मुलीने आईला फोन लावायचा प्रयत्न केला तो फोन लागला नाही. वारंवार कॉल करून सुद्धा फोन लागत नसल्याने ती मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत भडगावला आली. त्यावेळी ते राहत असलेले घर कुलूपबंद होते. त्यामुळे ती पुन्हा माघारी कुडाळला आली.

पहाटे वडिलांचा मुलीला फोन….

दरम्यान पहाटे ४.४८ वाजता संशयित ओमप्रकाश सिंह यांनी आपल्या मुलीला फोन करून सौ. रेणुका उर्फ रेश्मा हिला ठार मारल्याचे सांगितले. घराची चावी चुलीत ठेवली असल्याची कल्पना दिली. त्याप्रमाणे घर उघडून तिचे साहित्य ताब्यात घ्या असे त्याने सांगितले. हे ऐकल्यावर मुलीने आपल्या कुडाळ येथील नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली. आणि कुडाळ पोलिसात येऊन तक्रार दाखल केली. कुडाळ पोलीस भडगाव येथे घटनास्थळी पोहोचले असता सौ. रेणुका उर्फ रेश्मा मृतवस्स्थेत आढळली.

मृतदेहापाशी चिट्ठी

सौ. रेणुका उर्फ रेश्माच्या मृतदेहापाशी पोलिसांना चिट्ठी आढळली. त्यात खाली ओमप्रकाश सिंह अशी सही होती. ती चिट्ठी आपले वडील ओमप्रकाश सिंह यांनी लिहिलीय असल्याचे अक्षरावरून मुलीने पोलिसांना सांगितले. हिंदी भाषेतील त्या चिट्ठीत लिहिले होते कि, मला तिने मला धोका दिला आहे. कित्त्येकवेळा मी तिला परपुरुषासोबत गाडीने फिरताना बघितले आहे. तिला समजविण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण ती मला सोडणायचा विचार करत होती. मला हे मान्य नव्हते म्हणून मी तिला मारून टाकले.

खून करून ओमप्रकाशचे मुंबईला पलायन

आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर संशयित ओमप्रकाश पळून गेला. त्याचे मोबाईल लोकेशन दादर-मुंबई येथे सकाळी आढळले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे. त्यांना रेल्वे पोलिसांची देखील या प्रकरणी साथ मिळणार आहे. या पथकामध्ये श्री. मुंढे, श्री. माळगावकर यांचा समावेश आहे असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.

कुटुंब वीस वर्षांपासून सिंधुदुर्गात

दरम्यान मयत सौ. रेणुका उर्फ रेश्मा हि मूळची कर्नाटकची. खूप वर्षांपूवी ती आई वडिलांसोबत सिंधुदुर्गात आली. कुडाळ मध्येच त्यांचे वास्तव्य होते. झारखंडचा रहिवाशी असलेल्या ओमप्रकाश सोबत २० वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

मुख्य संपादक संजय चौधरी