कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईंची तक्रार

Spread the love

कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा सोशल मीडियात व्हायरल झालेला तो व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईं यांनी तक्रार केली असून या कीर्तनकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली, तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तृप्ती देसाई यांनी या विषयी आवाज उठवला आहे.

खाजगी आयुष्यातील चार भिंतींच्या आतमधील झालेली नैसर्गिक क्रिया जरी एकमेकांच्या संमतीने झाली असेल तरी जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ व्हायरल केल्याचे या प्रकरणात दिसत आहे. सामाजिक दृष्टिकोनातून ही बाब घातक असून तरुण पिढीच्या मनावर परिणाम करणारी आहे.समाजाला उपदेश करणारे किंवा समाजाचे प्रबोधन करणारेच जर असे गुन्हा करणार असतील तर त्यांच्या वर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तरी सदर विकृती कीर्तनकारावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी तृप्ती देसाई यांनी मागणी केली.

संभोग हा खासगी विषय पण चव्हाट्यावर मांडला यातून विकृती दिसते

परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु तो हेतु परस्पर चव्हाट्यावर मांडणे ही मनोविकृती म्हणावी लागेल. औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला असून त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिला प्रतिष्ठा आणि सामाजिक नीतीमूल्ये पायदळी तुडवणारी असल्याचं भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

कीर्तनकारावर या कायद्यान्वय कारवाई व्हावी

औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल महिला कीर्तनकार यांच्याशी संभोग करतानाचा व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल त्या कीर्तनकारावर सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A आणि 67-A आणि IPC 292 अंतर्गत त्याच्या वर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला कीर्तनकारानं घेतलं विष

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधील त्या महिलेने सोशल मीडियावर होतं असलेल्या बदनामी होतं असल्याचे पाहुनं टोकाचं पाऊल उचललं…. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.सदरील महिला वर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांची कारवाईची मागणी

दरम्यान कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येतं आहे.छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडीओमध्ये असलेल्या कीर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की,व्हिडीओमधील दोघेही “आनंद सांप्रदायिक” असून, त्याच विचारसरणीला मानून त्यांनी समाजामध्ये किर्तनकार म्हणून ख्याती मिळवली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानतात आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला आहे. लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तणुकीचे अश्लिल प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

टीम झुंजार