पुणे जिल्हा : शिक्रापुरात कार आणि खासगी बसचा भीषण अपघात,स्विफ्ट चालकचा मृत्यू तर पंचवीस प्रवाशी जण जखमी

Spread the love

लक्झरी पलटी होऊन वाहनांना धडकत थेट हॉटेलमध्ये
स्विफ्ट चालक युवकाचा मृत्यू तर पंचवीस प्रवाशी जण जखमी

शिक्रापूर- शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर बजरंग वाडी येथे स्विफ्ट कार आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्विफ्ट चालक युवकाचा मृत्यू  झाला असून २५प्रवाशी जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून एम एच १४ एच यु २२६५ हि लक्झरी बस पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने येत असताना अहमदनगर बाजूने आलेली एम एच १२ पि एन ६७२८ हि स्विफ्ट कार अचानकपणे दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूला येत लक्झरी बसवर आदळली यावेळी वेगाने आलेली लक्झरी बस अचानकपणे शेजारील रॉयल पॅलेस हॉटेल समोर असलेल्या विजेच्या खांब व हॉटेलच्या फलकाला धडकून पलटी होत थेट हॉटेल मध्ये घुसली यावेळी हॉटेलच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एन एच १२ एल व्ही ५११५, एन एच ०१ डी के १८०६, एन एच १२ सि के ८५६८ या तीन वाहनांना देखील लक्झरी धडकल्याने या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, विक्रम साळुंके, रणजीत पठारे, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक कल्पेश राखोंडे, राकेश मळेकर, शिवाजी तळोले, भरत कोळी, बापू हडागळे, विकास पाटील, संतोष मार कड, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, जयदीप देवकर, अमोल नलगे, विकास मोरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातातील वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली, यावेळी झालेल्या अपघातात कार चालक विशाल बबन सासवडे वय ३४ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याचा जागीच मृत्यू झाला.

बसमधील प्रवाशी दिपक नरेंद्र अगरवाल वय २८ वर्षे रा. अगरवालनगर धुळे, माणिकचंद चिमणलाल जैन वय ६७ वर्षे रा. षंकरषेठ रोड पुणे, हरिषकुमार विजयनंद दुबे वय ३३ वर्षे रा. दापोडी पुणे, शरयू मनिश जाखेटे वय २२ वर्षे रा. देवपुर धुळे, प्रकाश आप्पासाहेब तुर्मतमक वय ६४ वर्षे रा. मॉडेल कॉलनी पुणे, पुजा किसन खैरनार वय २९ वर्षे रा. केशवनगर मुंढवा पुणे, मुकेश वेदप्रकाश सुरवसे वय २८ वर्षे रा. म्हाडा कॉलनी औरंगाबाद, शीतल दिपक चौघुले वय ३३ वर्षे रा.

धानोरी पुणे, कुषाग्र दिपक चौघुले वय 8 वर्षे रा. धानोरी पुणे, नागेष हरिभाऊ शिंगाडे वय ४८ वर्षे रा. वारजे माळवाडी पुणे, अशोक पुरुषोत्तम बोरसे वय ६५ वर्षे रा. धायरी पुणे, कल्पना अशोक बोरसे वय ६० वर्षे रा. धानोरी पुणे, तेहरिम सज्जाद अहमद मोमिन वय २१ वर्षे रा. मालेगाव नाशिक, फायझा फरहद षोएब अहमद मोमिन वय २१ वर्षे रा. मालेगाव नाशिक, कृतिका मधुकर पाटील वय २३ वर्षे रा. देवपुर धुळे, प्रणीत गोकुळ बागुल, वय ३४ वर्षे रा. आंबेगाव बुद्रुक पुणे, समर्थ मिलींद वैद्य वय २१ वर्षे रा. साठेवाडा एफसी रोड पुणे,

रिटा संजय भग वय ४० वर्षे रा. गुरूनानक सोसायटी धुळे, सौम्या संजय भगत वय १५ वर्षे रा. गुरूनानक सोसायटी धुळे, संदीप भरत षटकर वय ३५ वर्षे रा. धायरी पुणे, नंदीनी राजसाहेब वाघ वय २७ वर्षे रा. विमाननगर पुणे, मोहम्मद युनुस इत्तेखार वय २४ वर्षे रा. मालेगाव नाशिक, सोमनाथ गोरक्ष शेंडे वय ३२ वर्षे रा. आडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर, सोमनाथ मधुकर भोसले वय ४६ वर्षे रा. श्रीगोंदा अहमदनगर, राजा भाईसाहेब सिंग वय ४२ वर्षे रा. भोसरी पुणे हे जखमी झाले आहे तर या जखमींपैकी सोमनाथ गोरक्ष शेंडे, सोमनाथ मधुकर भोसले व राजा भाईसाहेब सिंग या तिघांची प्रकृती गंभीर आहे.

या घडलेल्या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राकेष दिलीप मळेकर वय ३४ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कार चालक मयत युवक विशाल बबन सासवडे वय ३४ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.

टीम झुंजार