पारोळा :- सदर बाचतीत सवीस्तर वृत्त असे की, दिनांक ३/१०/२०२४ रोजी बालाजी महाराजांचे वहन ओढण्याच्या किरकोळ वादातून दोन गटात मोठ्या प्रमाणावर दंगल सुरु झाली सदर दंगलीत जमावाने शासकीय वाहनाची तसेच विद्युत रोहीत्राची तोडफोड करुन शासकीय मालमत्तेस नुकसान पोहचवले तसेच दगड फेक करून १ महीला पोलिस अधिकारी व ९ पोलिसांना जखमी केले त्याचप्रमाणे पोलिस कर्मचारी श्री. महेश पाटील यांच्या डोक्यात जिवेठार मारण्याच्या इराद्याने जमावातील अज्ञात इसमाने लोखंडी रॉड ने मारहाण करुन दुखापत केली
म्हणून पोलिस कर्मचारी किशोर भोई यांनी दिलेल्या तक्रारी वरून बी.एन.एस सन २०२४ च्या कलम १०९,१३२,१११,१८१(२), १९१(२),११०,१८९(५),११८ (५), ११० प्रमाणे पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणात किशोर देवराम वानखेडे, तूल सुनिल वानखेडे, विनय शांताराम चौधरी, आनंद सुनिल आंढागे, श्याम सुरेश चौधरी, किरण रविन्द्र बावीस्कर, मंगेश शांताराम चौधरी, गणेश दगा पाटील, कैलास सुरेश वानखेडे, अभिषेक संजय आंबेकर, हेमंत निथा महाजन, सुनिल सुभाष महाजन यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.
सदर प्रकरणात सदर संशयीत आरोपीतर्फे पारोळा येथील विथितज्ञ अॅडव्होकेट उज्वल बी. मिसर व अॅडव्होकेट सिध्दांत उज्वल मिसर अशांनी अमळनेर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदर प्रकरणी विधीतज्ञ अॅडव्होकेट मिसर यांचा युक्तिवाद ऐकुन घेण्यात आला तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅडव्होकेट एस.आर. पाटील यांनी युक्तिवाद केला दिनांक २४/१०/२०२४ रोजी अमळेनर सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश श्रीमती. सि.बी. पाटील यांनी आरोपी यांना प्रत्येकी १ लाख रुपये रकमेच्या जामीन जात मुचलक्यावर जामीन मुक्त केले असून त्यांना प्रत्येक बुधवारी दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत पारोळा पोलिस स्टेशन येथे हजेरी देण्याचा आदेश करण्यात आलेला आहे.
: