आदिवासी बांधवांनी दिशाभूल करून धर्मांतर करणाऱ्यांपासून सावध राहावे-

Spread the love

उत्तम नगर येथे आदिवासी समाजातर्फे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम.
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-
आदिवासी समाजाने व्यसनांपासून दूर राहावे तसेच आदिवासी समाज हा हिंदू असून दिशाभूल करून धर्मांतर करणा-या धार्मिक गुरूंपासून सावध राहावे असे आवाहन जमनालाल महाराज यांनी केले.वनवासी कल्याण आश्रम,विविध हिंदुत्ववादी संघटना,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मालय फाट्याजवळ असलेल्या उत्तमनगर येथे रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आदिवासी समाजाचे प्रवचनकार जमनालाल महाराज आणि जतन महाराज यांनी आदिवासी बोली भाषेतून मार्गदर्शन केले.आदिवासी समाज विखुरलेला असून शेतांमध्ये वस्ती करून शेतीच्या कामांवर आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असल्याचे जमनालाल महाराज यांनी सांगितले..कष्टाळू आणि प्रामाणिक असलेल्या आदिवासी समाज हिंदू असून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेवून काही धार्मिक नेते त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करीत आहेत,अशा धार्मिक नेत्यांपासून समाजाने सावध राहावे असे आवाहन केले.आदिवासी समाजाचा धर्म हिंदू असून तो सनातन धर्म असल्याचे जतन महाराज यांनी सांगितले.रामायण काळात आदिवासी समाजाने मोठे कार्य केले असून सर्वांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण घेवून विकास करावा असे सांगितले.कार्यक्रमास तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते.ढोल ताश्यांच्या गजरात आदिवासींनी केलेले आदिवासी नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

पद्मालय फाट्यावर पुनर्वसित असलेल्या उत्तमनगरमधील आदिवासी वस्तीत पाण्याची सोय नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.वनवासी कल्याण आश्रम आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकवर्गणी जमा करून सर्व आदिवासी वस्तीत पाईपलाईन करून प्रत्येक घरात नळ बसवून देण्याचे काम सुरु केले आहे.रामनवमी निमित्त उत्तम नगर येथील आदिवासी वस्तीत “राम-खिचडी”च्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व आदिवासी बांधवांना श्रीराम,लक्षम ,सीता आणि हनुमान यांचे छायाचित्र असलेले फोटो वाटप करण्यात आले.कार्यक्रमास भाजप जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगदीश ठाकूर,गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल गुजर,संध्या महाजन,आरती ठाकूर,शोभा साळी,विवेख ठाकूर,गणेश सोनार,भरत महाजन,भूषण चौधरी,मांगीलाल पावरा,मुरलीधर बारेला,प्रकाश बारेला,सुभाष बारेला,ईरम काठेवाडी,सागर महाजन,हितेश सोनार,निलेश मानुधने,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव,हितेश चौधरी,शुभम मोराणकर,दीपक पाटील,राकेश पाटील,गणेश पाटील यांचेसह पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध भागातील आदिवासी युवकांनी सहकार्य केले.

टीम झुंजार