सावदा परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ, सकाळी – सकाळीच चोरट्यांचा गल्ल्यावर डल्ला, घटना सी सी टी व्ही मध्ये कैद

Spread the love

रावेर :- तालुक्यातील सावदा हे परिसरात मोठे शहर असून सावद्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावदा शहरात दि.२९ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुर्गामाता चौकातील लखन ट्रेडर्स व जनरल स्टोअर्स या दुकानातील पैशांच्या गल्ल्यातून सकाळी साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास ३५ ते ४० हजारांची रोकड काढून पसार झाले. सदरची घटना सी सी टी व्ही मध्ये कैद झाली असून त्यात दोन अंदाजे १४ ते १६ वयातील तरुण गल्ल्यावर बसून गल्ल्यातील रुपये खिशात भरताना दिसत आहेत. या संदर्भात सावदा पोलिसाना माहिती दिली असून पोलिसांनी सी सी टी व्ही ची तपासणी केली असून पुढील कारवाई करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सावदा येथीलच स्व. हरिभाऊ जावळे मार्गावरील साईपार्क येथील एका ईसमाच्या घरातून दिवाळीच्या लगभग मध्ये कुटुंब बाहेर गेल्याचा फायदा उचलत बंद घरातून लाखो रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना घडल्याचे सांगितले गेले.
त्याच प्रमाणे ओम कॉलनीतील कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधत तीन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन घराचा दरवाजा फोडून चोरी केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. असेच एक शूज दुकानांमध्ये पण पंधरा हजाराची चोरी झाली होती ही घटनाही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करावी हे नागरिकांकडून मागणी होत आहे

मुख्य संपादक संजय चौधरी