शेतातील विहिरीत पाय घसरून पडलेल्या भावजाईला वाचविताना सीआयएसएफ जवानाचा मृत्यू

Oplus_131072
Spread the love

पैठण :- तालुक्यातील लाखेगाव येथे गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शेतातील विहिरीत पडलेल्या भावजाईला वाचवताना सीआयएसएफ जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव किरण छगन कच्छे (रा.लाखेगाव ता.पैठण) असे आहे.

अधिक माहिती अशी की, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाखेगाव येथील किरण छगन कच्छे या तरुणाची सीआयएसएफ मुख्यालय रांची येथे दि.५ जानेवारी २०२२ रोजी भरती झाली होती. सुट्टी मिळाल्याने हा जवान आपल्या गावी लाखेगाव ता. पैठण या ठिकाणी आला होता. गुरुवारी दुपारी त्याच्या भावाची पत्नी संगीता राहुल कच्छे (वय ३२ रा. लाखेगाव) पाय घसरून विहिरीत पडली. भावजाईला वाचविण्यासाठी सदरील जवानाने विहिरीत उडी मारून तिचा प्राण वाचविला. परंतु विहिरीतील दगडाचा मार जवानाला लागल्यामुळे पाण्यातच सदरील जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

शुक्रवारी (दि.२९) सीआयएसएफ वरिष्ठ मुख्यालयाचे पथक दाखल होणार असून पुढील पंचनामा झाल्यानंतर या जवानाचे अंत्यविधी होणार आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश शेळके, बीट जमादार उबाळे हे करणार आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी