6 डिसेंबर रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दलित पँथर संघटना द्वारे अल्पोपहार वाटप ..!

Spread the love

सोनू संजीव क्षेत्रे

रायगड – बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी असला तरी ५ डिसेंबरलाच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांतील अनुयायांसह महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर अनुयायी दादर परिसरात दाखल झाले आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दलित पँथर संघटने कडून दादर चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना अल्पोपहार वाटप केले असून त्यांनी अभिवादन केले आहे उपस्थित महिला पदाधिकारी दलित पॅंथर रायगड जिल्हा
१) स्वाती शिंगारे- जिल्हाध्यक्ष
२) सोनाली अंभोरे – जिल्हा उपाध्यक्ष
३) सुप्रिया कांबळे – तालुका अध्यक्ष
४) रेश्मा कांबळे – तालुका उपाध्यक्ष
५) स्वाती चाव्हारे – कामोठे अध्यक्षा
६) वंदना झानकर – करंजाडे अध्यक्ष
७) शबाना शेख – करंजाडे उपाध्यक्ष
८) सुरेखा इतवणे – कामोठे शहर संघटक
चंद्रकला शिन गारे
रत्नमाला शिन गारे
सोना वने
शशिकला जाधव
मनीषा संजय सारंग
ज्योति लहुजी
दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले रायगड जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड

मुख्य संपादक संजय चौधरी