एरंडोल :- श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती दि. ८ डिसेंबर रविवार रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांसह शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, जयंती निमित्त शहरातील जहांगीर पुरा परिसरात असलेल्या संताजी चौक येथे सकाळी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजनकरून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संताजी महाराजांच्या कार्याबद्दल माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, प्रा. मनोज पाटील, बबलू चौधरी, माजी नगरसेवक विजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आनंदा चौधरी (भगत) यांनी केले. आभार तेली समाजाचे अध्यक्ष गुलाब चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक अतुल महाजन, राजेंद्र शिंदे, प्रमोद महाजन, सामाजिक कार्यकर्ते अनिल चौधरी, होमगार्ड समादेशक प्रवीण ढाकणे, अमोल तंबोली, पितांबर चौधरी, आबा चौधरी, राजेंद्र चौधरी, भगवान चौधरी, शांताराम चौधरी, ईश्वर चौधरी, निंबा चौधरी, चंद्रकांत चौधरी, रवींद्र चौधरी, नितीन चौधरी यांचेसह तेली समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.