बाळाघाट, (मध्यप्रदेश):- एका मुलीने दोन महिन्यांत दोन विवाह केल्याची घटना समोर आली आहे. पहिल्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा कळले की, त्या मुलीने दुसऱ्या व्यक्तीशीही विवाह केला आहे.या मुलीचे नाव ज्योती नागपूर असून ती 24 वर्षांची आहे. तिने सांगितले की, तिने प्रथम रोहित उपवन्सी याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले. दोन महिन्यांनी तिने राहुल बुरडे याच्यासोबतही कोर्ट मॅरेज केले.
रोहित उपवन्सीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ज्योतीचा शोध घेतला. शोध सुरू असताना कळले की, ज्योतीने दुसऱ्या मुलाशी विवाह केला आहे. त्यानंतर दोन्ही पती पोलीस ठाण्यात पोहोचले आणि ज्योतीला कोणासोबत राहायचं यावर वाद सुरू झाला.
ज्योतीने सांगितले की, “मला दुसऱ्या पतीसोबत राहायचं आहे आणि लवकरच पहिल्या पतीला घटस्फोट देईल.” रोहित उपवन्सीने सांगितले की, “या दोघांचे नाते 8 वर्षांचे आहे आणि फक्त दोन महिनेच त्यांचे लग्न झाले आहे.” ज्योती आठवडाभरापूर्वी तिच्या आईची तब्येत खराब असल्याचे सांगून निघून गेली होती आणि परतली नव्हती. पोलिसांनी सांगितले की, “जर पहिल्या पतीने तक्रार केली, तर ज्योतीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.”