एरंडोल :- नवनिर्वाचित आमदार अमोलदादा पाटील यांचे शिवसेना कार्यालयात पदाधिका-यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केले.यावेळी विविध संस्थांच्यावतीने तसेच पदाधिका-यांनी आमदार अमोल पाटील यांचा सत्कार केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार अमोल पाटील प्रथमच शिवसेना कार्यालयात आल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पदाधिका-यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून तसेच फुलांचा वर्षाव करून त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी मतदारांनी विक्रमी मतदान केल्यामुळे जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.मागील पाच वर्षात आमदार चिमणरावजी पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे मतदारांनी विश्वास टाकला असून मतदारसंघातील विकासकामांची घौडदौड वेगाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त
केला.मतदारसंघातील सर्व गावांमध्ये भेटी देवून अपूर्णावस्थेत असलेली विकासकामे पूर्ण करून नवीन विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भाजप,शिवसेना व महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिका-यांनी आमदार अमोलदादा पाटील यांचा सत्कार केला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख बबलू चौधरी,तालुका
संघटक संभाजी पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम
गायकवाड,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय चौधरी, दैनिक सकाळचे बातमीदार आल्हाद जोशी,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,युवा सेना शहरप्रमुख कृष्णा ओतारी, व्यापारी आघाडीचे तालुकाप्रमुख परेश बिर्ला,जिल्हा परिषदेचे माजी
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,,माजी सभापती गबाजी पाटील,ताड्याचे माजी सरपंच सचिन पाटील,लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष कुणाल महाजन,माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आंधळे,कुणाल पाटील,गजानन पाटील,सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सचिन विसपुते,मयूर महाजन,टोळीचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.यावेळी आमदार अमोल पाटील यांनी परेश बिर्ला यांच्या निवासस्थानी भेट दिली मयुरी बिर्ला,अंजली बिर्ला यांनी त्यांचे औक्षण केले.