धक्कादायक! पेन्शनसाठी आईचा मृत्यू सहा महिने लपवला, बेडरूममध्ये मृतदेह दडवला

Spread the love


वॉशिंग्टन : पैशासाठी आणि संपत्तीसाठी लोक अनेक वेळा नातेसंबंधलाही बाजूला ठेवतात याचे एक अत्यंत घृणास्पद उदाहरण अमेरिकेत समोर आले आहे. अमेरिकेतल्या एका महिलेने केवळ आईची पेन्शन बंद होऊ नये म्हणून आईचा मृत्यू तब्बल सहा महिने लपवला. या कालावधीमध्ये या महिलेने आईचा मृतदेह आपल्या बेडरूममध्ये लपवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे.

अमेरिकेत न्यू हॅम्पशायर येथील ही घटना आहे. किंबरले हेलर असे या महिलेचे नाव आहे. ती मानसिक दृष्ट्या सक्षम असून ती मनोरुग्ण नाही किंवा तिचे तिच्या आई सोबत मतभेद होते असेही नाही फक्त आईच्या मृत्यूनंतर तिची पेन्शन बंद होणार असल्याने आईचा मृत्यू लपवण्याचा निर्णय तिने घेतला. त्यानंतर तिचा मृतदेह तिने बेडरूममध्येच लपवून ठेवला आणि या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये तिने कुणालाही घरात प्रवेश दिला नाही.

हेलरच्या शेजारी राहणाऱ्या काही लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती, त्यानंतर त्याचा तपास सुरू झाला आणि ही घटना उघडकीस जेव्हा आईचा मृतदेह पोलिसांच्या नजरेस आला, तेव्हा तो पूर्णपणे सडून गेला होता आणि परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती, पण केवळ पैशासाठी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ही दुर्गंधी सहन करून आईचा मृतदेह कोणत्याही अंतिम संस्कारविना बेडरूममध्ये ठेवला होता. मे महिन्यात किंबरलेच्या आईचा मृत्यू झाला होता आणि 18 नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर बेडफर्ड पोलिसांनी किंबरलेला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

टीम झुंजार