जरंडीत भाजपा चा दुहेरी जल्लोष;-महायुतीच्या शपथ विधीचाही अन अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाल्याचाही

Spread the love

सोयगाव, ता.१५(साईदास पवार).-राज्यमंत्रीमंडळाचा शनिवारी विस्तार होऊन महायुतीच्या मंत्र्यांनी मंत्री पदाचा शपथ विधी घेतल्या बद्दल आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केल्याने सिल्लोड-सोयगाव चे आमदार अब्दुल सतार यांचा मंत्री मंडळातून पत्ता कट झाल्या बद्दल जरंडी गावात शनिवारी रात्री भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला दरम्यान सिल्लोड-सोयगाव चे आमदार अब्दुल सत्तार यांची राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने चक्क भाजपनेच जरंडी गावात जल्लोष केला आहे स्थानिक भाजप कडून सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यात येऊ नये यासाठी निवेदन ही देण्यात आल्याचे भाजपचे उपसरपंच संजय पाटील यांनी सांगितले आहे दरम्यान  एकीकडे शनिवारी मंत्री मंडळाचा विस्तार होताच जरंडी गावात महायुतीच्या मंत्र्यांना मंत्री पदाची गोपनीयतेचे शपथ दिल्या मुळे भाजप ने जल्लोष केला तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार यांचा मंत्री मंडळात पत्ता कट झाल्याने  फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला आहे यावेळी उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, मधुकर पाटील, कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एकनाथ चौधरी ,भाऊराव पाटील ,अनिल छगन पाटील शिवाजी पंढरी पाटील, विनोद महाजन कैलास इंगळे, अनिल महाजन साई पाटील चेतन पाटील आदींची उपस्थिती होती..

मुख्य संपादक संजय चौधरी