संविधानवादी पक्ष संघटनेतर्फे पुकारण्यात आलेल्या सोयगाव बंदला १००% उत्स्फूर्त प्रतिसाद ; बंद शांततेत, प्रशासनास दिले निवेदन

Spread the love

सोयगाव :- साईदास पवार
परभणी येथे झालेल्या संविधान प्रतीकृती विटंबना व पोलिस अत्याचारात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी संविधानवादी पक्ष संघटनेतर्फे पुकारण्यात आलेल्या सोमवारच्या (दि.१६) सोयगाव बंदला १००% उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शांततेत पार पडला.
सोयगाव शहर बंद दरम्यान सोयगाव तहसील प्रशासनास निवेदन देऊन संतप्त भावना महाराष्ट्र सरकारला पोहचविण्याची विनंती करण्यात आली.

सोमवारी सकाळी विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मुक रॅली काढण्यात आली होती.ही रॅली दुपारी वाल्मीक पुरा – नारळीबाग मार्गे छ्त्रपती शिवाजी चौकात आल्यावर रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले.यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (राजरत्न. आंबेडकर) तालुकाध्यक्ष भारत पगारे,रिपब्लीकन सेना (आनंद आंबेडकर) तालुका अध्यक्ष अंकुश पगारे,आर पी आय (आठवले) गणेश पगारे,भारतीय बौद्ध महासभा सचिव सुभाष जाधव,नगर सेवक दीपक पगारे,राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील, अजय नेरपगारे,रवींद्र काळे,यांच्यासह संविधानवादी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, सुभाष सातदिवे,मुकुंदा वाहुळे,आर बी सरोदे,कवी गोपाळ इंगळे,आदींनी सभेस मार्गदर्शन केले.
सभेच्या समारोप प्रसंगी सोयगाव तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले.हे निवेदन तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चयनसिंग बहूरे,तलाठी शंकर देवतुळे महसूल सेवक शिवाजी शेरे,अनिल पवार व संतोष नवगिरे यांनी स्वीकारले.

मुख्य संपादक संजय चौधरी