सोशल मिडीयामुळे मुलांची वाचन क्षमता कमी झाली आहे.- सम्राट फडणीस; एरंडोलला दीपस्तंभ व्याख्यानमाला सुरु.

Spread the love

एरंडोल :- सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे मुलांची वाचन क्षमता कमी झाली असल्याचे प्रतिपादन सकाळ माध्यम समुहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी केले.योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र,राठी हॉस्पिटल,जळगाव येथील आर्यन फाउंडेशन, दीपस्तंभ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात ते ‘मिडीया व सोशल मिडीया आणि आपण सर्व’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेत सम्राट फडणीस यांचेसह पुणे ‘सकाळ’च्या संपादक शितल पवार यांनी पहिल्या पुष्पात मनोगत व्यक्त केले.रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.यावेळी ‘सकाळ’ माध्यम समुहाचे संपादक सम्राट फडणीस व शितल पवार यांनी सोशल मिडीयाच्या वापराचे फायदे व होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.शाली विद्यार्थी पुस्तकांपेक्षा मोबाईलमध्ये जास्त गुंतले असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.मोबाईलमुळे लहान मुलांची एकाग्रता कमी झाली असून याबाबत सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगितले.सद्यस्थितीत परिवारातील सदस्य
संवाद साधण्याऐवजी मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांशी संदेशांची देवान घेवाण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईलच्या अतिवापरामुळे मनावर,मेंदूवर विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.प्रत्येक व्यक्तीने सोशल मिडीयाचा व मोबाईल वापराचे नियोजन करून गरजेपुरताच वापर करावा असे आवाहन केले.’सकाळ’ पुणेच्या संपादिका शितल पवार यांनी जागतिक पातळीवर माहिती व तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत असल्याचे सांगितले.तंत्रज्ञानामुळे माहिती लवकर मिळत असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे सांगितले.तंत्रज्ञानाचा जितका फायदा आहे त्यापेक्षा जास्त नुकसान जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली.सोशल मिडीयामुळे संवाद कमी झाला असल्याचे सांगितले.सोशल मिडीयावर आलेल्या
संदेशावर विश्वास न ठेवता त्याची खात्री करावी असे आवाहन केले.सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे मानवाच्या जिवनशैलीवर परिणाम झाला असल्याचे सांगितले.मोबाईलमुळे नाते संबंधांवर देखील परिणाम झाला आहे त्यामुळे सर्वांनी मोबाईलचा वापर करतांना जागरूक रहावे असे आवाहन केले.महागड्या
किमतीचा मोबाईल वापरणे हि एक fashan झाली असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.प्रा.जी.आर.महाजन यांनी प्रास्ताविक केले.स्वराली पाठक या विद्यार्थिनीने सुत्रसंचलन केले.दीपस्तंभचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.व्याख्यानमालेस माजी आमदार चिमणराव पाटील,मृणाल पाटील,पोलीसनिरीक्षक सतीश गोराडे,डॉ.नितीन राठी,डॉ.उज्वला
राठी,बाजार समितीचे माजी सभापती,शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांचेसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांमध्ये महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.

मुख्य संपादक संजय चौधरी