गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; स्टेटस ठेवल्याने मिळाली माहिती

Spread the love

परभणी : आर्थिक विवंचनेला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या बातम्या आजपर्यंत आपण अनेकवेळा वाचल्या असतील. परंतु, गावगुंडांचा त्रास सहन न झाल्याने चक्क एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या कार्यांचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पतीने व्हॉट्सअॅप स्टेटस याविषयीची माहिती ठेवल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे.

गावगुंडांचा त्रास सहन न झाल्याने पती पत्नीने गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला तर दोरी तुटल्यानं पत्नी बचावली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पतीने ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटले आहे की, गावातील 5 गावगुंडांकडून सतत मला आणि पत्नीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केले जाते असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून पती पत्नीने गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. ही धक्कादायक घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यात घडली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 14 एप्रिल रोजी मध्यरात्री सदर पतीने असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याची बाब पहाटे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या भावाला उठवले आणि त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना भयानक दृश्य नजरेस पडले. गळफास घेतल्याने पतीचा मृत्यू झाला होता तर त्यांच्या पत्नीने गळफास घेतल्यानंतर दोरी तुटल्याने त्या अत्यवस्थ होत्या. त्यांना तात्काळ परभणीच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

या प्रकरणात मृत्यू झालेल्या पतीने गळफास घेण्याआधी व्हॉट्सअॅप स्टेटसला काही मजकूर ठेवला होता. ज्यात 5 जणांची नावे आहे. या पाच लोकांकडून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल केले जात असल्याचे त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टीम झुंजार