सोयगाव;=(साईदास पवार ).- डिसेंबर महिना शालेय शैक्षणिक सहलीचा महिना आहे त्यासाठी मात्र गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, यांच्या परवानगी शिवाय पालकांची संमती आवश्यक केल्या मुळे शनिवारी जरंडीच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात पालकांच्या संमती साठी बैठक आयोजित करण्यात आली होती
जरंडी च्या फुले विद्यालयाची (दि.२६)ते (दि.२९) या चार दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर सह विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे मात्र त्यासाठी एस टी ला पालकांची संमती आवश्यक असल्याने ही बैठक घेऊन मुख्याध्यापक एस एन महाजन यांनी सहलीची माहिती दिली यावेळी त्यांनी पालकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांजवळ घरचे मोबाईल क्र देण्याचे सांगून पालकांची संमती घेतली दरम्यान एस टी ला विद्यार्थ्यांचा विमा आवश्यक असल्याने सोयगाव आगारने जरंडीच्या ८२ विद्यार्थ्यांचा विमा उतरविला आहे दरम्यान बैठकीत राजेंद्र वाघ,आर आर हनुमंते,श्रीमती सुजाता शिंदे आदींची उपस्थिती होती यावेळी उपसरपंच संजय पाटील, साईदास पवार दिलीप महाजन, आदींनी समस्या मांडल्या दरम्यान यावेळी बनेखा तडवी, अनिल महाजन, नंदू महाजन, अनिल जाधव,सांडू जाधव, विकास राठोड, ज्ञानेश्वर महाजन समाधान चव्हाण सोपान पाटील,अनिल पाटील,आदींसह पालकांची उपस्थिती होती…