साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे

Spread the love

पुणे :- येथील साहित्यिक कलावन्त प्रतिष्ठानचे तीन दिवसीय चोविसवे मराठी साहित्य संमेलन दि.२७,२८,२९ डिसेंम्बर २०२४ रोजी पुणे येथील कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. सदर साहित्य संमेलनात चित्रप्रदर्शन,दोन एकांकिका,गीतगायन, कथाकथन,दोन परिसंवाद, प्रकट मुलाखत,दोन कवी संमेलने,पुरस्कार वितरण,व गझल मैफिल अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गझलमिलाफ या गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तथा गझलकार प्रा.वा.ना.आंधळे यांची निवड करण्यात आलेली आहे.
गेल्या चार दशकांपासून काव्य लेखन करणाऱ्या प्रा.आंधळे यांनी यापूर्वी तीन राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून महाराष्ट्रासह गुजरात राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या विद्यापीठीय या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. मुंबई व दिल्ली दूरदर्शन मालिकांसाठी शीर्षक गीत लेखन करणाऱ्या प्रा.आंधळे यांच्या फर्मान या काव्यसंग्रहावर महाराष्ट्रातील चाळीस नामवंत अभ्यासक समीक्षकांनी समीक्षा लेखन केलेले आहे.त्यांच्या या निवडी बद्दल समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या या यशदायी वाटचालीचे उत्स्फूर्त कौतुक होत आहे. सदर संमेलनाचे उदघाटन २७ डिसेंम्बर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री माननीय ना.अदिती तटकरे यांचे शुभहस्ते होत असून संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तथा गीतकार प्रा.प्रवीण दवणे भूषवित आहेत. संमेलनास महाराष्ट्रातून अनेक प्रतिभावंत त्यात पानिपतकार डॉ.विश्वास पाटील,प्राचार्य विठ्ठल वाघ,रामदास फुटाणे,असीम सरोदे,केशव सखाराम देशमुख, प्रा.फ.मु.शिंदे, अच्युत गोडबोले,कल्पना दुधाळ,लता ऐवळे, ऐश्वर्य पाटेकर,देवा झिंजाड, भरत दौंडकर,प्रशांत केंदळे या मान्यवरांसह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे
सदर संमेलनाचे स्वागताध्यक्ष पुण्याचे माजी उपमहापौर दिलीप बराटे हे आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी