अमळनेर तालुक्यात पालनकर्त्यानेच ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; आरोपीस अटक.

Spread the love

प्रतिनिधी | अमळनेर
पालनकर्त्या बापानेच ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसाळे येथे घडली.
मध्य प्रदेशातील सेंदवा तालुक्यातील धांदरा येथील एक महिला पती दारूमुळे मेल्याने रेल्वेत भीक मागत होती. भीक मागताना तिची ओळख शिरसाळे येथील रवींद्र रणछोड पारधी याच्याशी झाली. त्याने मुलीसह महिलेला शिरसाळे येथे आणून झोपडीत राहू लागले होते. रवींद्र बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. मात्र चार पाच महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन लागल्याने तो महिलेला मारहाण करीत होता. तिला रेल्वेत भीक मागायला पाठवू लागला. महिला सुरत भुसावळ मार्गावर भीक मागून उदरनिर्वाह करीत होती. १९ रोजी भीक मागून ती परत आली असता तिला झोपडीत रवींद्र पारधी हा तिच्या ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत असताना दिसून आला. रवींद्रने महिलेला घराबाहेर पडू न दिल्याने महिलेला पोलिसात फिर्याद देता आली नाही. आज कशीबशी रेल्वेत भीक मागायला जाते सांगून पोलीस स्टेशन गाठत मारवड पोलीस स्टेशनला महिलेने फिर्याद दिल्यावरून आरोपी रविंद पारधी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्रला अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी