दोन वेग वेगळ्या गुन्ह्यात १२ गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने केलेल्या वाहतुकी प्रकरणी एरंडोल न्यायालयाने काय? दिला महत्वपूर्ण आदेश.

Spread the love

एरंडोल : – कत्तली करिता गोवंशाची वाहतूक केल्या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गु.र. क्रमांक २०९/२०२४ व गू.र. क्रमांक २३१ /२०२४ दाखल करण्यात आला होता.
सदर दाखल दोनही गुन्ह्यातील चारही जप्त वाहन (बोलेरो पिकअप ) परत मिळणेसाठी वाहन मालकांनी फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक १२०/२०२४ वसीम रहीम तंबोली यानी ,फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक १२१/२०२४ सैय्यद नईम सैय्यद रहीम यानी रा.नगरदेवळा ता.पाचोरा जि जळगाव , फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक १२६/२०२४ मनोज संतोष काळे यानी , फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक १२७/२०४ ललित सीताराम भोई रा.क्रांती नगर , शिरपूर जि धुळे यानी एरंडोल मे. न्यायालयात अर्ज दाखल केले. दाखल अर्जावर अनुक्रमे विजय प्रकाश देशमुख रा. साई नगर एरंडोल , सागर भास्कर महाजन रा. परदेशी गल्ली एरंडोल व राहुल राजू महाजन डीडीएसपी कॉलेज जवळ एरंडोल यांनी सदरील जप्त वाहन परत न देणे बाबत व गोवंशांना खावटी मिळणे साठी अर्जाकामी हजर होऊन हरकतदार म्हणून सदरचे अर्ज नामंजूर होणेस हरकती घेतल्या. व दोन्ही पक्षाच्या बाजू एकून घेत दि.१८/१२/२०२४ रोजी सदरील सर्व अर्जावर आदेश पारित करत एरंडोल मे. न्यायालयाने गाडी मालका सह गुन्ह्यातील संबंधींवर प्रति गोवंश गोशाळेत दाखल तारखे पासून ते खटल्याचा निकाल लागे पावेतो प्रति गोवंश २००/- रुपये पोटगी प्रति दिवस देण्याचा आदेश पारित केला. त्या अनुशंगाने रक्कम रु १०,०००००/- दहा लाखाचे देखील बंध पत्र वाहन मालकांना न्यायालयात सादर करावयाचे आदेश न्यायालयाने केले.
तसेच २५०००/- पंचवीस हजार रुपयांचा जामीन देऊन सदरची जप्त वाहने गाडी मालकांनी सुरक्षितता म्हणून खटल्याचा निकाल लागे पावेतो राखून ठेवणेबाबत बाबत बंधपत्र सादर करावयाचे आदेश मे.न्यायालयाने पारित केले यासह इतरही अटी शर्ती मे न्यायालयाने टाकल्या.

मुख्य संपादक संजय चौधरी