.

जोधपूर – देवदर्शनाला जात असताना भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात जस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात ट्रेलर आणि बोलेरोची धडक बसल्यामुळे झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा चक्काचूर झाला. हा अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहीती मिळताच घटनास्थळी बिलाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी अचल दान व त्यांचे पथक दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त भाविक हे चुरूचे येथील रहिवासी होते. मृतांमध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे.
उदय प्रताप सिंग, चैन सिंग, मंजू कंवर, पवन सिंग,आरसा, मधू आणि समुंदर सिंग अशी मृतांची नावे आहेत. तर चैन सिंग तंवर, समुद्र सिंग आणि पवन सिंग हे जखमी झाले आहेत. जोधपूरला रेफर करण्यात आले असून त्यांची कृती सद्या स्थिर आहे.
जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता आणि ग्रामीण एसपी अनिल कयाल यांनी मथुरादास माथूर रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली. त्याच्या तब्येतीची विचारणा केली. उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवू नये, असे निर्देश त्यांनी डॉक्टरांना दिले. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.