सोयगाव परिसरात रब्बी पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान;-बळीराजा हवालदिल : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Spread the love

सोयगाव,(साईदास पवार )..;-सोयगाव सह परिसरातील शेत शिवारांमध्ये वन्यप्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या कोवळ्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत, वनविभागाने दखल घेऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सोयगाव, जरंडी, रावेरी,वेताळवाडी,या परिसरातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणावर रानडुकरे, रोही आणि हरणांचे कळप आहेत. एका कळपामध्ये ६० ते ७० हरिण,रानडुक्कर, रोही असतात. या वन्यप्राण्यांचा शेत शिवारात मुक्त संचार सुरू असून शेतांमधील हरभरा,  मका व गहू या कोवळ्या पिकांना पायदळी तुडवून व फस्त करून कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान करीत आहेत. आतापासून ही स्थिती आहे. तर पीक परिपक्व होऊन तयार माल घरात येईपर्यंत या वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसानहोणार असल्याने वनविभागाने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.मात्र वनविभागाकडून तुम्ही ऑनलाइन तक्रार करा तेव्हाच पंचनामा करू असे उत्तर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.
चौकट;- रब्बीच्या पेरा वाढला मात्र वन्यप्राण्यांचा त्रास
—यंदा परतीच्या पावसाने रब्बी हंगामाचा पेरा वाढला आहे. मात्र वन्यप्राणी पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. अनेक शेतात पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा गहू, हरभरा, दादर, मका पिकांची स्थिती उत्तम आहे. परिसरात हरणांचा व रानडुक्कर चा उपद्रव सुरू आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकयांना रात्रंदिवस खडा पहारा द्यावा लागत आहे. वारंवार तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी दमछाक होताना दिसून येत आहे.
—–गहू, हरभरा, मका पिके तुडविले जाताहेत—
सोयगाव तालुका हा अजिंठ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेला आहे या ठिकाणी वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. ते थेट शेतात अतिक्रमण करीत आहेत. सुसाट धावत असल्याने त्यांच्या पायाने मका, गहू, हरभरा, केळी, भाजीपाला पिके तुडविली जात आहेत. नांदेडसह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात हरणांचा मोठा त्रास होत आहे. वनविभागाने याची दखल घेऊन तातडीने हरीणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे…..

मुख्य संपादक संजय चौधरी