उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना आता एक हजार रु दंड;-रेशन सह शासकीय योजना होणार बंद;- जरंडीच्या ग्रामसभेत ठराव

Spread the love

सोयगाव , ता.२५(साईदास पवार );-खबरदार!आता उघड्यावर शौचालय साठी जाल तर ग्रामपंचायत देणार एक हजार रु दंड आणि रेशनचे धान्यही बंद करणार असल्याचा महत्वपुर्ण ठराव बुधवारी जरंडी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत घेण्यात आला दरम्यान गाव परिसरात व गावाच्या बाहेर सी सी टी व्ही बसवून हातात डब्बे घेऊन शौचालय साठी जाणारा कॅमेऱ्यात कैद झाल्या वर त्याची चौकशी करून थेट एक हजार रु दंड व रेशनचे धान्य बंद करण्याची शिफारस तहसील च्या पुरवठा विभागात पाठविण्यात येईल व इतर शासकीय योजनांना ब्रेक लावण्यात येईल असा ठरावच बुधवरी जरंडी गावात ग्रामसभेत घेण्यात आला सरपंच स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला
  शौचालयाचा वापर न करता सोयगाव सह तालुक्यातील काही गावात उघड्या वर शौचालय करणाऱ्या ची संख्या कमी करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात येत आहे बुधवरी जरंडी ग्रामपंचायतीची पहिल्याच ग्रामसभेत एक हजार रु दंड,रेशनचे धान्य बंद करून शासकीय योजना बंद करण्यात येईल असा ठराव पारित करण्यात आला ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी ग्रामसभेस सुरुवात केली यावेळी ग्रामस्थांनी सर्वानुमते हा ठराव मान्य असल्याची अनुमती दिली दरम्यान उघड्यावर शौचालय करणाऱ्याच्या विरोधात मोहीम राबविण्यासाठी गाव स्तरावर गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले
—-जरंडीत तिसऱ्या डोळ्यांची राहणार नजर
जरंडी गावाच्या वेशीवर चारही बाजूंनी व मुख्य रस्त्यावर सी सी टी व्ही बसविण्यात आले आहे या कॅमेऱ्यात हातात डब्बा घेऊन आढळून येणाऱ्या ची कसून चौकशी करून त्याला दंड देऊन त्याच्या कुटुंबातील रेशनचे धान्य बंद करून शासकीय योजनेवर चाप बसविण्यात येणार असून उघड्या वर शौचालय करणाऱ्या कुटुंबियांच्या घराचे नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा ही बंद करण्यात येईल असेही ठरावात अधोरेखित करण्यात आले आहे
——विशेष ग्रामसभेत अजून एक महत्वपूर्ण ठराव करण्यात आला असून गावात आई वडिलांना सांभाळ न करणाऱ्या चा  मालमत्तेतून वारसा हक्क काढून त्याचा आई वडिलांच्या मालमत्तेत फेर घेण्यात येणार नसल्याचा ठराव सुनील मंगरुळे यांनी मांडून ग्रामस्थांनी त्यास मान्यता दिली आहे
विशेष ग्रामसभेत उपसरपंच संजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य वंदना पाटील,मधुकर सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील,अमृत राठोड,प्रकाश पवार,साईदास पवार ,उत्तम गवळे, शिवा चौधरी,राहुल चौधरी, विजय चौधरी, कैलास मातेरे,बनेखा तडवी,बचत गटांच्या वर्षा चौधरी,संध्या पाटील,अर्चना चव्हाण, शालू पवार,आरोग्य विभागाच्या आशा वर्कर, लाईनमन विकास पाटील,अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती होती लिपिक संतोष पाटील,सतीश बाविस्कर, अमृत रामधन, ग्राम रोजगार सेवक शांताराम पाटील आदींनी पुढाकार घेतला

मुख्य संपादक संजय चौधरी