सातारा जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय ; गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका! ४ दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आधीच सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

दोन वर्षांपूर्वी अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केले  होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे. काल मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता.

संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले  होते. काल रात्री उशिरा त्यांना सातारा येथे आणले  गेले. त्यांना सकाळी ११ वाजता कोर्टात हजर करण्यात आले. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टीम झुंजार