जवखेडेसिम ता.एरंडोल येथे विविध विकासकामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा आ.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.

Spread the love

एरंडोल :- जवखेडेसिम ता.एरंडोल या गावासाठी मुलभुत सुविधेसह मंजुर विविध विकासकामांचा भव्य भुमीपुजन व लोकार्पण सोहळा नवनिर्वाचित आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मा.अमोलदादा पाटील यांची मोठ्या मताधिक्याने एरंडोल विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सोहळा पार पडला. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.वासुदेव पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांच्या कुटुंबातर्फे देखील सत्कार करत अभिनंदन करण्यात आले.

प्रसंगी तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, मा.सभापती दादाजी पाटील, मा.सभापती अनिलभाऊ महाजन, धरणगांव बाजार समिती संचालक किरणदादा पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, एरंडोल नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष कुणालभाऊ महाजन, निपाणे येथील संजय पाटील, शरद ठाकुर, अंतुर्ली सरपंच गौरव पाटील, अंतुर्ली येथील गणेश पाटील, गालापुर येथील आरिफदादा, उत्राण येथील अमोल महाजन, एरंडोल येथील कुणाल पाटील यांचेसह जवखेडेसिम गावासह पंचक्रोशितील विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी