मित्रानेच अडकवले मित्राला सेक्स रॅकेटच्या जाळ्यात, कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य.
मुंबई :- वडाळा येथे राहणारा सचिन करंजे (25) हा मुलींना कामाला लावण्याच्या नावाखाली त्यांना लॉजवर घेऊन जाऊन त्यांना गुंगीचे औषध द्यायचा. त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत असत.अनेक मुलींसोबत त्याने असे प्रकार केले असून अखेर एका मुलीने याबाबत तक्रार वडाळा पोलीस स्टेशनमध्ये दिली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सचिनला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
या सर्व प्रकरणात सचिनचा मित्र वडाळा प्रतीक्षा नगर परिसरात राहणारा तन्मय केणी (27) याचे आधार कार्ड वापरून सचिन मुलींना लॉज घेऊन जात होता. मुलींचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू केली असता यावेळी 17 डिसेंबर रोजी तन्मय केणीला पोलिसांनी चौकशीसाठी वडाळा पोलीस स्टेशन मध्ये बोलवले.
पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासण्यास सुरुवात केली. याच वेळी तन्मय पोलीस स्टेशनमधून पळून गेला. तब्बल 10 दिवस तन्मय फरार होता. तशी मिसिंग कम्पलेट देखील नोंदविण्यात आली होती. मिसिंग कम्पलेट नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करण्यास सुरुवात केली. परंतु काल दिनांक 26 डिसेंबर रोजी मुलुंड येथील छेडा नगर पेट्रोल पंप जवळ तन्मयने स्वतःच्या हाताची नस कापलेल्या बेशुद्ध अवस्थेत सापडला.पोलिसांनी त्याला तात्काळ उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. पोलिसांना ज्या ठिकाणी तन्मय बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याच ठिकाणी तन्मयच्या जवळ सुसाईड नोट सापडली आहे. यात तन्मयने सचिन करंजेचा या नोटमध्ये उल्लेख केला आहे. सचिनने मला फसवले असून तो मला ब्लॅकमेल करत आहे. त्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. त्याला फाशी झाली पाहिजे.
सॉरी मम्मी पप्पा असे सुसाईड नोटमध्ये तन्मयने नमूद केले आहे. या प्रकरणी वडाळा आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस या घटनेचा आता अधिक तपास करत आहे. माझ्या मुलाला सेक्स रॅकेट मध्ये अडकवण्यात आले आहे. त्याला ब्लॅकमेल करण्यात आले आहे. त्याला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. असे कुठल्याच मुलासोबत झाले नाही पाहिजे. ज्याने माझ्या मुलाला फसवले आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं त्याच्या वडिलांनी सांगितले.