धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या

Spread the love

.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 5 जणांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 5 जणांच्या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येची ही घटना प्रयागराजमधील नवाबगंजमध्ये घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय मृत राहुल तिवारी त्याची ३८ वर्षीय पत्नी प्रीती आणि तीन मुले माही, पिहू आणि पोहू यांच्यासह खगलपूर येथे भाड्याच्या घरात राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळ कौशांबी जिल्ह्यातील मूळरूरचे आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. या हत्येमागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टीम झुंजार