Viral Video: हे सोशल मीडियाचे युग आहे, जिथे प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे आहे. रिलचा हा नाद तरुणांमध्ये अधिकतर दिसून येतो. क्षणभराची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकालचे तरुण आणि तरुणी आपला जीव धोक्यात घालून काही भयानक आणि जीवघेणे स्टंट्स करू पाहतात.बऱ्याचदा असे हे रिल्स व्हायरल होतात मात्र हा जीवघेणा खेळ आपल्या जीवावर देखील बेतू शकतो. असाच काहीसा प्रकार सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडल्याचे दिसून आले. भररस्त्यात रील बनवण्याची मजा तरुणांना तरुणांना आयुष्यभराची सजा देऊन गेली. व्हिडीओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर बऱ्याच अतरंगी रिल्स व्हायरल होत असतात. लोक क्षणिक प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर असे व्हिडिओज तुम्ही नक्कीच कधी ना कधी पाहिले असावेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात रील बनवताना तरुणांसोबत एक भीषण अपघात झाल्याचे दिसून आले. व्हिडिओ बनवताना अनेकदा लोक आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष देत नाहीत आणि मग भयंकर दुर्घटनेला बळी ठरतात. व्हायरल व्हिडिओत थरारक अपघाताचे दृश्य दिसून आले, जे पाहून तुम्ही हैराण व्हाल.
काय आहे व्हिडिओत?
तर व्हायरल व्हिडीओमध्ये आपण नीट पहिलं तर यात दिसत की, काही तरुण-तरुणी रील बनवण्यासाठी चालू रस्त्यावर उतरले आहेत. आपला जीव धोक्यात घालून आणि परिस्थितीची अजिबात जाण न ठेवता रील बनवायला जातात आणि आपल्या आयुष्याचं मातेरं करून बसतात. व्हिडिओत आपण पाहू शकता की, काही तरुणांचा ग्रुप एकत्र रस्त्यावर एक रील बनवण्याच्या तयारीत असतात. आजूबाजूचे भान न ठेवता ते रस्त्यावर चालू लागतात आणि तितक्यात मागून एक भरधाव गाडी त्यांना जोरदार धडक देऊन जाते. ही धडक इतकी भीषण असते की यात सर्वजण अक्षरशः हवेत उडताना दिसून येतात. हा व्हिडिओ नक्की कुठला हे अद्याप समजले नसले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
अपघाताचा हा व्हिडिओ @priyarajputlive नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रीलचे व्यसन हे अफू आणि चरसपेक्षाही घातक आहे. रीलासाठी लोक जीवाचीही पर्वा करत नाहीत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मागून एक भरधाव कार येऊन त्या सर्वांवर धावत असताना काही मुलं-मुली रस्त्यावर कसे रिले काढत आहेत ते पहा’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील मांडले. एका युजरने लिहिले, “कारचालकही रील बनवणाऱ्यांमध्ये सामील असू शकतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “या लोकांना केव्हा समजणार की, आयुष्य हे लाइक्सपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.