Viral Video:नवी दिल्ली : लग्नाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये भरमंडपात नवरदेव नवरीकडे किस मागतो. नवरदेवाची डिमांड पाहून नवरीला लाज वाटते.ती नकार देते. पण नवरा ऐकत नाही. शेवटी ती असं काही करते की सगळे पाहत राहतात. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
सध्या लग्नात काही ना काही नवीन पाहायला मिळते. आता या व्हिडीओमध्येच पाहा, नवरदेवाने भरमंडपात चक्क किस मागितली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत. त्यांच्या हातात जयमाला आहे. दोघंही वरमाला घालण्याच्या तयारीत आहेत. नवरी वरमाला घालायला जाते. तेव्हा नवरदेव तिला वरमाला घालू देत नाही. तो आपल्यावर गालावर बोट ठेवून नवरीकडे किस मागतो. नवरी लाजते. लग्नाला आलेले सगळे लोक ओरडू लागतात.
नवरी नाही म्हणत मान डोलवताना दिसते. नवराही आपल्या हट्टावर कायम राहतो. जोपर्यंत किस देणार नाही तोपर्यंत वरमाला घालून घेणार नाही असं तो इशाऱ्याने सांगतो. नवरीसुद्धा नाही नाही म्हणते. पण शेवटी नवऱ्याच्या हट्टासमोर ती हार मानते. नवरदेवाला ती किस करते. त्यानंतर नवरदेव लगेच गुडघ्यावर बसतो आणि नवरी त्याला वरमाला घालते. साहजिकच हा क्षण दोघांसाठी खास ठरतो.@ChapraZila या एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे आणि तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी याला गोड, मजेशीर, क्युट डिमांड म्हटलं आहे. तर काहीजणांनी लग्नाचं गांभीर्य समजत नाही असं म्हणत याला लाजिरवाणं म्हटलं आहे.तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, तुमची यावर प्रतिक्रिया काय आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
लग्नात वरमाला का घालतात?
लग्नात वधूवराने एकमेकांना फुलांचे हार घालण्याच्या विधीचा इतिहास भगवान शंकर-पार्वती आणि श्रीराम-सीता यांच्या विवाहापासूनचा आहे असं मानलं जातं. हा विधी पूर्ण करून, वधू आणि वर सात जन्मांसाठी लग्नबंधनात अडकण्यासाठी पहिलं पाऊल टाकतात. दोघंही एकमेकांना पुष्पहार घालतात, याचा अर्थ दोघंही एकमेकांना आयुष्यभर पती-पत्नी म्हणून स्वीकारतात.
वर वधूला वरमाला आधी का घालत नाही?
ही परंपरा सुरू झाली, तेव्हा पुरुषांना स्त्रीशी लग्न करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागायचं, त्यामुळे मुलींचे स्वयंवर व्हायचं. ज्यामध्ये मुलगी तिच्या आवडीच्या पुरुषाला वरमला घालून लग्नासाठी निवडायची. म्हणूनच आताही वधू वराच्या गळ्यात आधी वरमाला घालतात.