एरंडोल महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळा संपन्न

Spread the love

एरंडोल :- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल येथे एरंडोल तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. दादासाहेब अमित पाटील, लोकमतचे पत्रकार बी. एस. चौधरी, एरंडोल वार्ताचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव, दैनिक सकाळचे पत्रकार आल्हाद जोशी, दैनिक नवराष्ट्र चे पत्रकार प्राध्यापक शरद महाजन, प्रहार दणकाचे पत्रकार कैलास महाजन, दैनिक देशदूत चे पत्रकार जावेद मुजावर, दैनिक देशोन्नती चे पत्रकार कमर अली सय्यद, झुंजार न्यूज चे पत्रकार संजय चौधरी, पत्रकार चंद्रभान पाटील, प्राचार्य डॉ. ए जे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकारांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांची प्रतिमा पूजन करून या पत्रकार सन्मान सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कु. कल्याणी देशमुख व कु. मयुरी चौधरी यांनी स्वागत गीताने केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ए .जे.पाटील यांनी केले .

आपल्या मनोगतात दैनिक देशदूत चे पत्रकार जावेद मुजावर यांनी शायरी अंदाजाने पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल आनंद झाला असे सांगितले. महाविद्यालयाच्या कार्याचा गौरव केला व दादासाहेब अमित पाटील यांनी हा उत्कृष्ट कार्यक्रम घडवून आणला याबद्दल आभार मानले. पत्रकार प्रल्हाद पाटील यांनी पत्रकाराने दिलेल्या बातम्यांबद्दल लोकांच्या प्रतिक्रियांवर प्रकाश टाकला. दैनिक लोकमतचे पत्रकार व एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी एस चौधरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य व पत्रकारांची जबाबदारी यावर भाष्य केले. एरंडोल वार्ता चे पत्रकार शिवाजीराव अहिरराव यांनी हा पत्रकार सन्मान सोहळा असाच नियमित चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष यांनी पत्रकार हे सत्याची कास धरणारे, समाजाला दिशा देणारे व लोकशाहीचे रक्षण करणारे चौथे स्तंभ असतात. पत्रकारांवर मोठी जबाबदारी असते असे मनोगत व्यक्त केले. तसेच नवीन पत्रकारांनी जेष्ठ पत्रकारांकडून अनुभवाचे बोल घ्यावेत असा सल्ला दिला.

याप्रसंगी एरंडोल तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार प्रा.नितीन पाटील, उप प्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, माजी प्रभारी प्राचार्य एन. ए. पाटील, प्रा.डॉ बालाजी पवार, प्रा. सचिन पाटील, प्रा. उमेश गवई, प्रा. राहुल पाटील, प्रा. सुरज वसावे यांनी प्रयत्न केले.
याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य आर. एस. पाटील, प्रा.नितीन दांडेकर, प्रा. महेंद्र शिरसाठ प्रा. अतुल पाटील,प्रा.मीना काळे प्रा. रेखा साळुंखे, प्रा. सविता पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हेमंत पाटील यांनी केले व आभार डॉ. उमेश गवळी यांनी मांडले.

मुख्य संपादक संजय चौधरी