नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवा, नाही तर ग्रामपंचायत निर्माण साठी ना हरकत ‌दखला द्या.…संघर्ष समितीची मागणी

Spread the love

एरंडोल :- शहरात वाढत्या समस्यांना नागरिक कंटाळले असून संघर्ष समिती ने वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा केली तरीही नगरपरिषद प्रशासन हे विषयांचे गांभीर्याने दखल घेत नाही त्यामुळे एरंडोल शहर संघर्ष समिती ने मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांना निवेदन देऊन समस्या सोडवा किंवा आम्हाला नवीन वसाहत साठी ग्राम पंचायत निर्मिती साठी ना हरकत दाखला द्या अशी मागणी संघर्ष समिती अध्यक्ष रवींद्र लाळगे, उपाध्यक्ष नामदेव पाटील, संचालक कायदे तज्ञ सल्लागार ॲडव्होकेट दिनकरराव पाटील, स्वप्नील सावंत, दिनेश चव्हाण, पी आर पाटील, नानाभाऊ मिस्तरी, रघुनाथ कोठावदे, व पदाधिकारी यांनी निवेदनात केली.
निवेदनात नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात याची यादीच मुख्याधिकारी यांना सादर केली.
नविन वसाहती मध्ये अजूनही काही ठिकाणी रस्ते अर्धवट आहेत, रस्ता तयार करतांना गुणवत्तेवर लक्ष नाही, शहरात व नविन वसाहत मध्ये भुमिगत गटारी आवश्यक आहेत त्या बाबतीत लवकरच कार्यवाही व्हावी जेथे गटारी आहेत तेथे नियमित सफाई करावी, अमृत जलवाहिनीचे काम एक वर्षापासून सुरु आहे ते पावसाळ्यापुर्वी पुर्ण करा ,जल वाहिनीचे काम झाल्यावर रस्ता पुर्ववत व्यवस्थित करावा ,आठवडे बाजार नियोजित जागी भरवावा ,मेन रस्त्यावर बाजार भरतो त्यामुळे जिवित हानी होवू शकते याला जबाबदार कोण ?,या समस्येकडे दुर्लक्ष का होत आहे., संपूर्ण शहरात किमान 4 थ्या दिवशी पाणीपुरवठा नियमित व्हावा, पाणी पुरवठा करणारे कर्मचारी फोन स्विकारत नाहीत माहिती तात्काळ देत नाहीत यामुळे नागरिकांना संभ्रम निर्माण होतो कर्मचारी दुर्लक्ष करतात ही बाब चुकीची आहे, विद्या नगर व साने गुरुजी ‌येथील व इतरही ओपन जागा सुशोभित कराव्यात तसेच तेथे सार्वजनिक स्वच्छता गृह निर्माण करावेत. अंजनी नदी शहरातून जाते तेथे अतिशय दुर्गंधी झाली आहे तेथे स्वच्छता व्हावी नदी सुशोभित करण्यात यावी, नगर परिषद फक्त करात वाढ करते आज स्थिती ला एरंडोल येथे इतर शहरांच्या तुलनेने कर जास्त आहे त्यामुळे 15% करवाढ ही अन्याय करणारी आहे ही करवाढ रद्द करण्यात यावी.आणि नगरपरिषद हे करू शकत नाही तर नविन वसाहत मध्ये स्वतंत्र ग्राम पंचायत निर्मिती साठी आपला ना हरकत दाखला द्या अशी मागणी संघर्ष समिती ने केली आहे
या साठी शहरात जनजागृती अभियान राबविण्यात येईल असे समीतीने नमुद केले शेवटी स्वप्नील सावंत यांनी आभार मानुन निवेदनाची त्वरित दखल घ्यावी अशी भावना व्यक्त केली

मुख्य संपादक संजय चौधरी